Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : सोनसाखळी चोरट्याला अटक; 3 गुन्ह्यांची उकल

Nashik Crime : शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने शिंदेगावातील उड्डाणपुलाखाली अट्टल सोनसाखळी चोरट्याला जेरबंद केले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने शिंदेगावातील उड्डाणपुलाखाली अट्टल सोनसाखळी चोरट्याला जेरबंद केले. चौकशीतून उपनगर हद्दीतील दीड वर्षांपूर्वीची जबरी चोरीसह ओझर व वाळुंज (जि. संभाजीनगर) येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. आकाश भाऊसाहेब चव्हाण (२५, रा. मातीनगर, सुरेगाव, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या सोनसाखळी चोरट्याचे नाव आहे.

विशेष शाखेचे अंमलदार रवींद्र दिघे यांना संशयित आकाश शिंदेगावात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार विशेष शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि त्यास जेरबंद केले. त्याच्याकडून दुचाकी (एमएच १७ सीझेड ८७७५) जप्त केली आहे. पोलिस चौकशीमध्ये त्याने ३ आक्टोबर २०२२ रोजी गांधीनगर प्रेसजवळ रिता अशोक लोध (रा. जेलरोड) यांच्या गळ्यातील राणीहार खेचून नेला होता. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे.

तसेच, वाळूंज (जि. छ.संभाजीनगर) व ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी सराईत सोनसाखळी चोरटा आकाशला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत नागरे, लाड, रंजन बेंडाळे, ताजणे, गायकर, भामरे, दिघे, योगेश चव्हाण, ठाकरे, नांद्रे, बागडे, येवले गांगुर्डे, भागवत, चव्हाण यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : मिठाई विकत घेण्याआधी हा व्हिडिओ पाहा ! आवडीने कचोरी विकत घेतली, घरी जाऊन पॅकेट उघडून पाहिले तर... धक्कादायक प्रकाराने खळबळ

Heat Risk : शहरी भागात उष्णतेचा धोका वाढला! ‘हीट एक्स्पोजर’मध्ये १५७ टक्क्यांनी वाढ; आयआयटीएमचा अहवाल

JOB IN TEAM INDIA : वैभव सूर्यवंशीसोबत काम करण्याची संधी! भारतीय संघात ५ पदांसाठी भरती; BCCIने मागवलेत अर्ज, करा अप्लाय

Marathi News Live Updates : हिंगणघाटमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वात स्मार्ट मीटरविरोधात जनआक्रोश मोर्चा

Numerology: Love Marriage की Arranged? 'या' ३ मूलांकांच्या लोकांचे जुळतात सर्वाधिक प्रेमविवाह; जाणून घ्या जन्मतारखेत दडलेलं लग्नाचं रहस्य!

SCROLL FOR NEXT