Court Order esakal
नाशिक

Nashik Crime News : न्यायालयाच्या आदेशाने जीवे मारण्याचा गुन्हा दाखल

Nashik News : जुन्या भांडणाच्या गुन्ह्यात संशयितांविरोधात जबाब दिल्यास मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या संशयितांनी तिचा पाठलाग करून कोयत्याने वार करीत मारहाण केल्याची घटना डिसेंबर २०२३ मध्ये घडली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दिंडोरी रोडवरील मार्केट मधील भाजी विक्रेत्या महिलेला जुन्या भांडणाच्या गुन्ह्यात संशयितांविरोधात जबाब दिल्यास मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या संशयितांनी तिचा पाठलाग करून कोयत्याने वार करीत मारहाण केल्याची घटना डिसेंबर २०२३ मध्ये घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने पंचवटी पोलिसांना सहा संशयितांविरोधात जीवे ठाण मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Court order murder case registered)

संदीप अशोक लाड (३५), धरम भास्कर शिंदे (४०), रमेश पांडुरंग बोडके (४१), सुरज उर्फ सुर्या रमेश बोडके (३०), विनोद रमेश बोडके (२८), धीरज रमेश बोडके (२५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पद्‌मा प्रकाश शिंदे (रा. भराडवाडी, फुलेनगर, पेठ रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्या दिंडोरी रोडवरील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विक्री करतात.

संशयितांशी त्यांचे जुने भांडण झालेले आहे. ५ डिसेंबर २०२३ ला रात्री आठच्या सुमारास त्या भाजीपाला विक्री केल्यानंतर पायी घराकडे जात असताना संशयितांनी त्यांना अडविले आणि, ‘आपल्या भांडणाच्या गुन्ह्यात आमच्याविरोधात जबाब दिला तर तुझ्यावर बलात्कार करू. तुला मारून टाकू अशी धमकी देऊ लागले.’ (latest marathi news)

त्यामुळे घाबरलेल्या पद्‌मा शिंदे यांनी भयभीत होऊन पळ काढला. त्यावेळी संशयित संदीप लाड याने पाठीमागून लोखंडी कोयत्याने मारून दोन वार केले. तसेच संशयित धरम शिंदे याने लोखंडी रॉडने मारहाण केली. तर, संशयित रमेश, सूरज, विनोद आणि धीरज यांनी महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याप्रकरणी पद्‌मा शिंदे यांनी न्यायालयात धाव घेत खटला दाखल केला होता. त्यावर जिल्हा न्यायालयात महिलेने धाव घेत खटला दाखल केला होता. या खटल्याचा गांभीर्याने विचार करीत न्यायालयाने आरोपीविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT