Fraud Crime  esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : कर्जाच्‍या आमिषापोटी आर्थिक फसवणूक; मुंबईतील वित्तीय संस्‍थेच्‍या संचालकाविरोधात गुन्‍हा

Nashik News : शेतीमध्ये ॲग्रो टुरीझमकरिता दोन कोटी रुपयांचे कर्ज काढून देण्याचे आश्‍वासन देत एकाची आर्थिक फसवणूक केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुंबईच्‍या मुलुंड येथील ब्रिज असोसिएट्‌स या वित्तीय संस्‍थेच्‍या माध्यमातून शेतीमध्ये ॲग्रो टुरीझमकरिता दोन कोटी रुपयांचे कर्ज काढून देण्याचे आश्‍वासन देत एकाची आर्थिक फसवणूक केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गणेश माळोदे यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे. (Financial fraud with lure of loan)

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दोन कोटी रुपयांचे कर्ज काढून देण्याचे आश्‍वासन देऊन फेब्रुवारी २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत संशयित सुधीर चव्‍हाण याने फिर्यादीदार माळोदे यांच्‍याकडून पैसे उकळले. शेतजमिनीचा प्रकल्‍प अहवाल तयार करणे.

लेखापरीक्षण अहवाल, तसेच इतर कायदेशीर कागदपत्रे बनविण्यासाठी तीन लाख ६५ हजार रुपयांची मागणी संशयिताने केली. त्‍यानुसार माळोदे यांनी दोन वेगवेगळ्या धनादेशाद्वारे ही रक्‍कम, तसेच सातबारा उतारा, खाते उतारा, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेचे स्‍टेटमेंट दिले.

त्यानंतर संशयिताने त्‍यांना व्‍हॉट्‌सॲपच्‍या माध्यमातून कर्ज मंजुरी पत्रदेखील पाठविले. पण कर्जाची रक्‍कम उपलब्‍ध होत नसल्‍याने आपली फसवणूक झाल्‍याचा संशय माळोदे यांना आला. त्यानंतर त्‍यांनी यापूर्वी अदा केलेले पैसे परत करण्याची मागणी संशयिताकडे केली.

त्यानंतर त्‍याने एक लाख रुपये फोन पेद्वारे परत केले. मात्र उर्वरित दोन लाख ६५ हजार रुपये व मूळ कागदपत्रे परत न दिल्‍याने माळोदे यांनी त्‍याच्‍याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT