Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : महिलेच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

Nashik News : इंदिरानगर परिसरातील कलानगरमध्ये पीडितेच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इंदिरानगर परिसरातील कलानगरमध्ये पीडितेच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. सदरची घटना जून २०२१ मध्ये घडली होती. अमोल कैलास शेजवळ (३२, रा. भीमनगर, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. (Forced labor for accused in case of molestation of women)

पीडितेच्या फिर्यादीनुसार, ९ जून २०२१ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपीने पीडितेशी अश्लील बोलून विनयभंग केला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास हवालदार बी.पी. ठाकरे यांनी करीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.डी. जोशी यांच्यासमोर खटल्याचे कामकाज झाले. (latest marathi news)

सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अर्चना शिंदे यांनी कामकाज पाहत साक्षीदार तपासले.

आरोपीविरोधातील दोष सिद्ध झाल्याने न्यायाधीश जोशी यांनी आरोपीला एका वर्षाची सक्तमजुरी व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार आर.के. पाटील, सुधाकर गायकवाड यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT