Court Order esakal
नाशिक

Nashik Crime News : घरफोडीतील सराईत चौघांना सक्तमजुरी; चोरीचा माल खरेदी करणाऱ्यासही शिक्षा

Crime News : सदरची घटना १६ फेब्रुवारी २०१७ रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी सायखेडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सायखेडा शॉपिंग मार्केट कॉम्प्लेक्समधील दुकान फोडून टायर्स व एलइडी टीव्ही असा २ लाख ८६ हजारांचे साहित्य चोरी करीत घरफोडीच्या गुन्ह्यातील चौघांना निफाड न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी तर चोरीचे साहित्य खरेदी करणाऱ्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा ठोठावण्यात आलेले आरोपी मालेगावातील आहेत. (Crime Forced labor for four criminals in burglary)

अशरफ हमीद शेख, फय्याज अल्लाउददीन अन्सारी, साजिद अन्वर पटेल, गफार मुक्तार सय्यद यांचा तीन वर्षे तर, जावेद अहमद मोहम्मद अन्सारी (सर्व रा. लालानगर, मालेगाव) यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

सदरची घटना १६ फेब्रुवारी २०१७ रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी सायखेडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक उपासे व नंतर पोलीस निरीक्षक मोरे यांनी तपास करीत चौघांना अटक केली. त्याच्याकडून ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला होता. तर चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी जावेद अन्सारी यासही अटक करण्यात आली होती. निफाड नयायालयात दोषारोप पत्र सादर केले. (latest marathi news)

याप्रकरणी निफाड न्यायालयात सुनावणी होऊन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भेंडे यांनी आरोपींना शिक्षा सुनावली. तर, सरकारी अभियोक्ता तोरणे यांनी सरकार पक्षाचे कामकाज पाहिले. उपनिरीक्षक शशिकांत सैंदाने, नाईक महाजन यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT