Two suspects who dragged the gold texture in the Adgaon area. Along with the team of Unit One of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : सोनसाखळी चोरटे 24 तासांत जेरबंद; शहर गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी

Nashik Crime : सोन्याची पोत खेचून नेणाऱ्या दोघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : आडगाव हद्दीतील जत्रा हॉटेल परिसरातून पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेणाऱ्या दोघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे. संशयितांकडून सोन्याच्या लगडसह मुद्देमाल असा २ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. (Gold chain thieves jailed within 24 hours )

सोमनाथ हरिश्चंद्र त्रिभुवन (४२, रा. जाधव संकुल, अंबड), मलय आरसन मडसामी (३६, रा. बेलापूर, नवी मुंबई) असे अटक केलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांची नावे आहेत. सोमवारी (ता.५) जत्रा हॉटेल परिसरातील मीरापार्क अपार्टमेंटसमोर पायी जाणाऱ्या महिलेची पोत मोपेडवरून आलेल्या दोघांनी खेचून नेली होती. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे अंमलदार प्रशांत मरकड यांना संशयित अंबडच्या जाधव संकुलात येणार असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंगळवारी (ता.६) दुपारी सापळा रचला आणि दोघांना जेरबंद केले. संशयितांनी पोलिस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, संशयितांना आडगाव पोलिसांकडे सोपविले आहे. ही कामगिरी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, संदीप भांड, शरद सोनवणे, नाझीम खान पठाण, जगेश्वर बोरसे, समाधान पवार यांच्या पथकाने बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Bhavan Clash: वाद नेत्यांमध्ये, पण भिडले कट्टर कार्यकर्ते! पडळकरांचा मारहाण करणारा आणि आव्हाडांचा मारहाण झालेला कार्यकर्ता कोण?

Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis: ‘’...तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात’’ ; उद्धव ठाकरे कडाडले!

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

SCROLL FOR NEXT