Crime
Crime esakal
नाशिक

Nashik Crime : सातपूर औद्योगिक वसाहतीत लिफ्ट कोसळून मजुराचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बाबासाई बेकरी कंपनीतील नवीन लिफ्टची टेस्टिंगचे काम सुरू होते. त्यावेळी बेरिंग निसटल्याने लिफ्ट तुटून सुमारे २० फुटांवरून खाली पडली. या अपघातामध्ये एक युवक ठार तर, तिघे गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१) सायंकाळी घडली होती. याप्रकरणी सातपूर पोलिसात ऋषीकेश इंजिनिअरिंग प्रा.लि.चे संशयित राहुल शिवाजी चोपडे यांच्याविरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik Crime Laborer dies in Satpur industrial estate marathi news)

कुणाल चंदनवाल मोटवाणी (३२) असे मृत युवकाचे नाव आहे. शाहरुख खान (२५), दिनेश कमलेश बैठ (२५), कमलेश महेंद्र चंद्रवशी (२०) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, एशियन इलेक्ट्रॉनिक्ससमोर नव्याने निर्माण झालेल्या बाबा साई बेकरीत शुक्रवारी सायंकाळी मटेरिअल वाहून नेणाऱ्या लिफ्ट टेस्टिंगचे काम सुरू होते. (Latest Marathi News)

त्यावेळी संबंधित ठेकेदाराने निष्काळजीपणा केला. बेरिंग तुटल्याने लिफ्ट उंचावरून खाली पडली असता, चौघे जण गंभीर जखमी झाले. मोटवाणी यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमी तिघांवर उपचार सुरु आहेत. सातपुरातील पवन चंदवाणी यांच्या फिर्यादीनुसार संशयिताविरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, हवालदार सूर्यवंशी तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ''कोण येतंय कोण नाही, याच्यावर आमचं लक्ष'' मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

T20 World Cup Retire Out : टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच असा आऊट झाला खेळाडू, जाणून घ्या काय आहे नियम?

VIDEO: "यावेळी निवडणुक कोण जिंकेल?"; रितेशचा प्रश्न, जिनिलियाच्या भन्नाट उत्तरानं वेधलं लक्ष, मजेशीर व्हिडीओ व्हायरल

Solapur Crime: खळबळजनक! सोलापुरमधील मोदी स्मशानभूमीतून १० महिन्यांच्या बाळाचा मृतदेह गायब; जादू टोण्याच्या संशय

Latest Marathi News Live Update : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची तब्येत खालावली

SCROLL FOR NEXT