Nashik Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : अवैद्य मद्य वाहतूक करणाऱ्या मुख्य संशयिताला बेड्या; सिल्वासा येथून घेतले ताब्यात

Nashik Crime : ट्रकचा पाठलाग करताना झालेल्या अपघातात पोलिसाचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना यापूर्वीच ताब्यात घेतले होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : अवैद्य मद्य वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करताना झालेल्या अपघातात पोलिसाचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना यापूर्वीच ताब्यात घेतले होते. मुख्य संशयित, मुख्य डीलर राहुल ज्योती सहाणी (वय ४४, रा. नारोली रोड, सिल्वासा, गुजरात) याच्या नाशिक ग्रामीण पोलिसांनी सिल्वासा येथून मुसक्या आवळल्या आहेत. संशयिताने घरातील एसी डकमधून उडी मारून जंगलात पळ काढला होता. मात्र पोलिसांनी पाठलाग करीत त्याला पकडले. ( Main suspect of illicit liquor trafficking jail by police)

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक अवैध मद्य वाहतूक करण्याच्या संशयावरून सोमवारी (ता. ८) मध्यरात्री क्रेटा वाहनाचा पाठलाग करीत होते. त्या वेळी क्रेटा वाहनचालकाने शासकीय वाहनावरील चालक कैलास कसबे व इतर अंमलदाराचा खून करण्याच्या हेतूने शासकीय वाहनास धडक दिली. त्यात कसबे यांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी गुजरातमधून अश्पाक अली मोहमंद शेख (वय २२) यास पकडले. क्रेटाचालक देवीश कांतिलाल पटेल (वय ३७) हा चांदवड न्यायालयात हजर झाला होता. या दोघांनाही न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

चिखलातून सिनेस्टाइल पाठलाग

संशयित राहुल यास पोलिसांची चाहूल लागताच तो घरात बसविलेल्या एसीच्या डकमधून घराबाहेर पडला. त्यासाठी त्याने साडी बांधून पाठीमागील बाजूने जंगलात पळ काढला. उपनिरीक्षक घुगे, हवालदार दीपक गुंजाळ, शांताराम घुगे, नाइक प्रकाश कासार, रमेश चव्हाण, देवा गोविंद, नरेंद्र कोळी यांच्या पथकाने जंगलातील चिखलातून सिनेस्टाइल पाठलाग करून राहुलला पकडले. राहुलविरोधात गुजरात राज्यात अवैध मद्य वाहतूक प्रकरणी सात गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'TET' सक्तीचा नेमका आदेश काय? ११० पानांच्या आदेशावर शासन सुस्पष्ट परिपत्रक काढून दूर करणार संभ्रम; २०१० पूर्वीच्या शिक्षकांना दिलासा मिळू शकतो, पण...

उजनी धरण 100 टक्के भरलेले! शेतीसाठी सुटणार 15 जानेवारीनंतर पाणी; यंदा उन्हाळ्यात शेतकऱ्यांना 3 आवर्तने, ‘या’ 3 उपसा सिंचन योजना जूनपर्यंत पूर्ण होणार

Morning Breakfast Recipe: थंडीच्या दिवसात सकाळी नाश्त्यात झटपट बनवा ब्रोकोली सुप, सोपी आहे रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 डिसेंबर 2025

Panchang 11 December 2025: आजच्या दिवशी हळद, बेलफळ चूर्ण किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

SCROLL FOR NEXT