Police presenting a suspect in a molestation case in court esakal
नाशिक

Nashik Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, संशयीतास पोलिसांकडून अटक

Latest Crime News : अल्पवयीन मुलीस आपटी बॉम्ब घेऊन देतो. असे आमिष दाखवून पडक्या इमारतीत नेऊन विनयभंग केला.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : अल्पवयीन मुलीस आपटी बॉम्ब घेऊन देतो. असे आमिष दाखवून पडक्या इमारतीत नेऊन विनयभंग केला. मंगळवार (ता.८) रात्रीच्या सुमारास जुने नाशिक परिसरात घटना घडली. पोलिसांनी अवघ्या काही वेळातच संशयीतास अटक केले. पीडित चिमुकली नवरात्रोत्सवानिमित्ताने दांडिया खेळत होती. स्थानिक रहिवासी असलेला संशयित महेश रघुनाथ वांद्रे (वय.४७) याने पीडितास आपटी बॉम्ब घेऊन देतो असे आमिष दाखविले. (Minor girl molested suspect arrested by police )

तिला एका पडक्या इमारतीत घेऊन जात तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील वर्तन करून विनयभंग केला. घडलेला प्रकार पीडिताने कुटुंबीयास सांगितला. कुटुंबीयांसह परिसरातील काही जणांनी संशयीतास चोप दिला. भद्रकाली पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य घेता तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयीतास ताब्यात घेतले. पीडीतास विश्वासात घेऊन चौकशी केली. तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

यापूर्वीही काही दिवसांपूर्वी संशयिताने असाच प्रकार केला असल्याचे सांगितले. त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची अधिक चौकशी पोलीस करत आहे. बुधवार (ता.९) दुपारी त्यास जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यानिमित्ताने लहान मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

अवैध धंद्यांचा अड्डा

घटना घडली ती पडकी इमारत पूर्वी महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्राची होती. काही कारणास्तव आरोग्य केंद्र बंद पडल्याने नशेबाज आणि चोरट्यांनी इमारतीचे दारे खिडक्या आतील साहित्य चोरून नेले. सध्या ती इमारत पडीक आणि धोकादायक झाली आहे. नशेबाज आणि गुन्हेगारांचे आश्रयस्थान ठरत आहे. महापालिकेकडून संबंधित इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करून त्याठिकाणी पुन्हा रुग्णालय निर्माण करावे. अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT