Deputy Superintendent of Police Bapurao Dadas, Police Inspector Rahul Tasare and police team while investigating Chivos wine shop and area. esakal
नाशिक

Nashik Crime News : इगतपुरीत वाइन शॉपवर दरोडा; गुन्हा दाखल

Nashik Crime : चोरट्यांनी दरोडा टाकत दोन लाख १४ हजार ९०० रुपये व ६१ हजार १०० रुपयांच्या विविध प्रकारच्या किमतीच्या मद्याच्या बाटल्या, असा एकूण दोन लाख ७६ हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरातील तळेगाव शिवारात मुंबई-नाशिक महामार्गाच्या सर्व्हिस रोडलगत असलेल्या चिवॉस वाइन शॉपवर शुक्रवार (ता. १६) पहाटेच्या सुमारास तळीराम चोरट्यांनी दरोडा टाकत दोन लाख १४ हजार ९०० रुपये व ६१ हजार १०० रुपयांच्या विविध प्रकारच्या किमतीच्या मद्याच्या बाटल्या, असा एकूण दोन लाख ७६ हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. (Nashik Crime)

कमलेश हरिप्रसाद नामदेव (वय ४७, वाइन शॉप मॅनेजर, रा. दुडमनिया, पो. दुडमनिया, ता. महुगंज, जि. रिवा, मध्य प्रदेश, हल्ली मु. चिवॉस वाइन्स शॉपशेजारी, शुभवास्तू आपार्टमेंट, तळेगाव शिवार) यांनी दिली आहे. घटनास्थळी पोलिस पथकाने पंचनामा करीत तपास सुरू केला असून, चोरट्यांनी शॉपमधील व परिसरातील सीसीटीव्हीच्या वायरी तोडून डीव्हीआर नेल्याने चोरट्यांची ओळख पटवणे अवघड झाले आहे.

पोलिस उपअधीक्षक बापूराव दडस व पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांनी भेट दिली. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करीत तपास सुरू केला आहे. पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कांचन भोजने, एस. एस. जाधव, पोलिस हवालकार परदेशी, गोपनीय पोलिस नीलेश देवराज, विजय रूद्रे, अभिजित पोटिंदे आदी पथक करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT