crime news  sakal
नाशिक

Nashik Crime News : देवगाव येथे अवैद्य धंद्यांचा कळस

सकाळ वृत्तसेवा

देवगाव : देवगाव परिसरात अवैध दारूविक्री जोरात सुरू असून, दारू वाहतूक करणाऱ्या भरघाव मोटारसायकलने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या माजी सरपंच विनोद जोशी यांचे पुत्र, राधेकृष्ण मित्रमंडळाचे अध्यक्ष धनंजय जोशी यांना उडवले. या धडकेत चार-पाच युवक वाचले. अपघातानंतर ही बातमी गावात कळताच शेकडो संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यावरच ठिय्या मांडला. जोपर्यंत गावात व परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. या वेळी पोलिस उपनिरीक्षक लहानू धोक्रट यांनी ग्रामस्थांना आत्ताच तुमच्यासमोर गावात धाडसत्र मारून ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी ठिय्या मागे घेतला.


नव्याने दाखल झालेले पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना दिल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी अवैध धंदे करणाऱ्यांवर कार्यवाही देखील केली. परंतु त्यानंतर देखील अवैध धंदे सुरू असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी गावात विविध ठिकाणी केलेल्या धडक कार्यवाहीत बेकायदेशीर दारूसाठा व मुद्देमाल सापडला. संबंधितांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लहानू धोक्रट, पोलिस नाईक संदीप शिंदे, पोलिस नाईक औदुंबर मुरडनर, गणेश बागूल, पोलिसपाटील सुनील बोचरे यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Property Expo : पुण्यात घर घ्यायची सुवर्णसंधी ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रा’ उद्यापासून; गुंतवणुकीचे पर्याय एकाच छताखाली

MPSC Result : क्लास वन अधिकारी होऊन केले वडिलांचे स्वप्न पूर्ण, सातारारोडच्या कन्येची भरारी; MPSC परीक्षेत राज्यात पटकावला नववा क्रमांक

Latest Marathi News Live Update : महाशिवरात्र निमित्त वेरूळ येथे श्री घृष्णेश्वर मंदिरात महास्वच्छता अभियान

Pune Crime : मुलाने दारुच्या नशेत वडिलांना जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू; पुण्यात धक्कादायक घटना

Vasai Fire: वसईत कंपनीला भीषण आग! आगीचा भडका अन् धुराचे लोट परिसरात पसरले; घटनेनं भीतीचं वातावरण, Video Viral

SCROLL FOR NEXT