caller tune esakal
नाशिक

Nashik Crime News : खुनाची माहिती द्यायला 112 नंबरवर त्याने पोलिसांना कॉल केला अन्...

सकाळ वृत्तसेवा

अंबासन : ट्रिंग... ट्रिंग... ट्रिंग पोलिसांच्या डायल ११२ या क्रमांकावर कॉल करीत खुन झाल्याची माहिती मिळताच जायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबासन येथे उपनिरीक्षक तुषार भदाणे यांच्यासह तपास पथक पाठवले. मात्र, गावात अशी कुठलीच घटना घडली नसल्याने एका वेडसर व्यक्तीने खोडसाळपणा केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले.

पोलिस प्रशासनाकडून नागरिकांच्या सोयीसाठी ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, बऱ्याचदा सोयीस्कर सुविधेचा दुरुपयोग होत असल्याने पोलिस प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. अंबासन येथील आदिवासी वस्तीतून एका अज्ञात वेडसर व्यक्तीने गावात खुन झाल्याची माहिती दिली.

हेही वाचा: Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

जायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपनिरीक्षक तुषार भदाणे, पोलिस कॉन्स्टेबल पंकज खैरनार, रवींद्र भामरे, पंकज गुंजाळ आदींचे तपास पथक पाठवले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अरूण कोर व उपाध्यक्ष गणपत आहिरे यांनी परिसरात सखोल माहिती घेऊन सदर व्यक्ती वेडसर असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. मात्र, संबंधित वेडसर व्यक्तीच्या दिशाभूल करणाऱ्या खुनाच्या खोट्या माहितीमुळे पोलिस प्रशासनाची पुरती झोप उडाली होती.

११२ प्रणाली नागरिकांच्या सोयीसाठी केलेली असताना त्याचा दुरुपयोग व पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी करणे दुदैवी बाब आहे. नागरिकांनी फक्त योग्य कामासाठीच या प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

''नागरिकांनी लहान मुलांना मोबाईल हातात देताना काळजीपूर्वक लक्ष द्यावे. चुकीचा संदेश किंवा कॉल झाल्यास पोलिस प्रशासनाचा वेळ जातो. यापुढील काळात असे चुकीचे संदेश देणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाकडून कठोर पाऊल उचलले जातील.'' - तुषार भदाणे, पोलिस उपनिरीक्षक, जायखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT