Nashik Crime News  esakal
नाशिक

Nashik Crime News : आर्थिक देवाणघेवाणीतून एकाला अपहरण करून बेदम मारहाण!

Nashik News : सातपूर औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात आर्थिक देवाणघेवाणीतून एकाला कारमध्ये डांबून अपहरण करीत बेदम मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सातपूर औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात आर्थिक देवाणघेवाणीतून एकाला कारमध्ये डांबून अपहरण करीत बेदम मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला. मारहाणीनंतर कर्जदारास निर्जनस्थळी सोडून दिल्यानंतर सावकाराच्या तावडीतून सुटलेल्या संबंधिताने पोलीसात धाव घेतल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. (Nashik Crime One was kidnapped and brutally beaten by financial exchange)

तसेच यानिमित्ताने बेकायदा सावकारी चर्चेत आली असून याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनू जाधव (रा.नाशिक रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित अपहरणकर्त्यांचे नाव आहे.

याबाबत योगेश पांडुरंग हिरे (४५ रा. जाधव संकुल,अशोकनगर) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार हिरे व संशयित जाधव यांच्यात आर्थिक व्यवहार आहेत. सोमवारी (ता.१७) जाधव कार घेऊन घरी आला. (latest marathi news)

त्याने हिरे यांना त्याच्या कारमध्ये बसवून नाशिक रोडला त्याच्या घरी नेले. त्यानंतर देवळाली भगूर मार्गे वाडिवऱ्हे परिसरात निर्जनस्थळी शिवीगाळ व दमदाटी करीत हिरे यांना मारहाण केली.

तसेच हिरे यांना या ठिकाणी सोडून देत निघून गेल्यानंतर हिरे यांनी कसे बसे घर गाठून पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी पोलिस दप्तरी अपहरणासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नळकाडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT