Gambling Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : सातपूरला जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा! अण्णाच्या मळा हॉटेललगत सुरू होता जुगार

Nashik Crime : झाडाच्या आडोशाला राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातपूर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातपूर परिसरातील बजरंग नगरमध्ये अण्णाचा मळा हॉटेल जवळ असलेल्या नाल्यातील झाडाच्या आडोशाला राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातपूर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Police raid gambling den in Satpur near Annamalai Hotel )

नेताजी वसंत आहिरे (३४, रा. भगवती अपार्टमेंट, सातपूर कॉलनी), मनोज अशोक भंदुरे (२८, रा. राजश्री पार्क, अशोकनगर, सातपूर), सतिश पुंडलिक गांगुर्डे (३३, रा. सावतानगर, सिडको) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सातपूर पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकाला जुगार अड्डा सुरू असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार बजरंग नगरमध्ये असलेल्या अण्णाचा मळा हॉटेललगत नाला आहे.

या नाल्यातील झाडाच्या आडोशाला भरदिवसा राजरोसपणे पैसे लावून ५२ पत्त्यांवर अंदर-बाहर जुगार खेळविला जात होता. पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर बुधवारी (ता. १७) दुपारी चारच्या सुमारास छापा टाकला असता, संशयित जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले. पोलिसांनी यावेळी २ हजार ९१० रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी अंमलदार भूषण शेजवळ यांच्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France vs Senegal : किलियन एमबापेने मोडला मेस्सीचा विक्रम अन् नोंदवले २ वर्ल्ड रेकॉर्ड; मुंबईपेक्षा लहान देशाची फ्रान्सला कडवी टक्कर

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

SCROLL FOR NEXT