Crime News esakal
नाशिक

Nashik Child Labor Crime : आडगाव हद्दीतील हॉटेलमधून बालकामगारांची सुटका! हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल

Crime News : याप्रकरणी हॉटेल मालकाविरोधात आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरची कारवाई कामगार उपायुक्तालयाने केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Child Labor Crime : मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारातील हॉटेल महाराजा काठीयावाडी याठिकाणी दोघा बालकामगारांना राबवून घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हॉटेल मालकाविरोधात आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरची कारवाई कामगार उपायुक्तालयाने केली आहे. (Rescue of child labor from hotel in Adgaon area)

रविभाई मगनभाई रसाडिया (रा. नाशिक) असे संशयित हॉटेल मालकाचे नाव असून, त्यास आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षक विशाल पाटील यांच्या फिर्यादीनुसार, कामगार उपायुक्त कार्यालयाच्या पथकांकडून शहर-जिल्ह्यातील विविध हॉटेल्स, खासगी आस्थापनांमध्ये बालकामगारांचे शोषण होत आहे का, हे पडताळण्यासाठी मंगळवारी (ता. ११) अचानक धाडसत्र राबविण्यात आले.

या कारवाईदरम्यान, आडगाव हद्दीतील मुंबई - आग्रा महामार्गालगत महाराजा काठियावाडी या हॉटेलवर मंगळवार सायंकाळी पथकाने छापा टाकला. त्यावेळी पथकाने हॉटेलचे किचन व परिसराची झडती घेतली असता, त्यावेळी सायंकाळी पावणेसात वाजता १६ आणि १७ वयोगटातील दोन बाल कामगार त्याठिकाणी पथकाला आढळून आले.

दोघेही बालकामगार हे राजस्थानमधील लसाहिया येथील असल्याचे चौकशीतून समोर आले. पथकाने त्यांना ताब्यात घेत, त्यांना बालसहाय्य मंडळाच्या स्वाधीन करण्यात आले. संशयित रविभाई रसाडीया याने स्वत:च्या फायद्यासाठी हॉटेलात बालकामगारांना काम देऊन बारा तास जास्त श्रमाचे काम करून घेतले.

तसेच, त्यांना साप्ताहिक सुट्टी न देता आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करुन क्रूरपणाची वागणूक दिल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार, आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार आर.पी. मगर हे तपास करीत आहेत. (latest marathi news)

कारवाईचा फार्स तर नाही!

नाशिक शहर आणि जिल्ह्यात हजारो हॉटेल्स असून, याठिकाणी बालकामगारांना राबवून घेतले जाते. अत्यंत कमी वेतनावर त्यांच्याकडून अवजड स्वरुपाचीही कामे करून घेतली जातात. परंतु कामगार उपायुक्त कार्यालयाकडून सातत्याने कारवाई होत नाही. परिणामी, हॉटेल व्यावसायिकांची मुजोरी वाढली आहे.

त्यातही कामगार उपायुक्त कार्यालयाकडून कारवाई न होण्यामागे हितसंबंधाचीही चर्चा नेहमीच होत असते. परंतु आत्ताच हा कारवाईचा फार्स का, असाही प्रश्न यानिमित्ताने चर्चेला आला असून, नियमित कारवाई केल्यास असे अनेक बालकामगार अनेक ठिकाणी सापडू शकतात. परंतु कामगार उपायुक्तांच्या पथकांमार्फत नियमित व प्रामाणिक कारवाई होत नाही हे मात्र वास्तव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT