Nashik Crime esakal
नाशिक

Nashik Crime : सिडकोतील गोळीबार प्रकरणात शेवाळे, शिंदे यांची कारागृहात रवानगी

Nashik Crime : अंकुश शेवाळे, प्रसाद शिंदे या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिडकोत ॲड. प्रशांत जाधव यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील संशयित अंकुश शेवाळे, प्रसाद शिंदे या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा कटकारस्थान करणारा संशयित दीपक बडगुजर अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. रिपाइंचे पदाधिकारी व ॲड. प्रशांत जाधव यांच्यावर १४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री दोन मोपेडवरून आलेल्या संशयितांनी गोळीबार केला होता. ( Shewale and Shinde sent to jail in cidco firing case)

यात ते थोडक्यात बचावले होते. या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल आहे. दोन वर्षांनी याप्रकरणाची उकल झाली आहे. आत्तापर्यंत सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. शिवसेनाचा (उबाठा) कार्यकर्ता अंकुश शेवाळे, प्रसाद शिंदे या दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी (ता २१) न्यायालयात आणण्यात आले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात केली.

तर, मयूर बेद, बारक्या व सूर्यतळ हे यापूर्वीच मध्यवर्ती कारागृहात रवाना झाले आहेत. या प्रकरणात दीपक बडगुजर याचे नाव समोर आले आहे. परंतु तो पसार आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत परंतु अद्याप त्याचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. दीपक परदेशात असल्याची चर्चा मात्र आहे. याबाबत पोलिस काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

T20 WC, IND vs ENG SF: अभिषेक शर्मा दुसऱ्याच षटकात गेला, संजू सॅमसन म्हणालेला, अरे घाई नको करू... ! इंग्लंडच्या रणनीतीने हैराण

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News Live Update : इस्रायलकडून इराणवर मोठे ड्रोन हल्ले

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

SCROLL FOR NEXT