Sarai criminal arrested in Nilgiri Bagh area. including the anti-gang squad of the city crime branch esakal
नाशिक

Nashik Crime News: पसार झालेला सराईत गुंड गावठी कट्ट्यासह जेरबंद! गुंडाविरोधी पथकाने केली निलगिरी बागेत कारवाई

Crime News : गेल्या पाच महिन्यांपासून प्राणघातक हल्ल्यातील गुन्हयामध्ये पसार असलेल्या सराईत गुंडाला आडगाव हद्दीतील निलगिरी बाग परिसरातून शिताफीने अटक करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या पाच महिन्यांपासून प्राणघातक हल्ल्यातील गुन्हयामध्ये पसार असलेल्या सराईत गुंडाला आडगाव हद्दीतील निलगिरी बाग परिसरातून शिताफीने अटक करण्यात आले. उपनगर पोलिसांसह गुन्हेशाखेचे पथके त्याचा शोध घेत होते. त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. (Nashik Crime gangster jailed with gavthi katta marathi news)

रोशन उर्फ बाले भागवत काळे (२४, रा. भीमनगर हौसिंग सोसायटी, जेलरोड, नाशिकरोड) असे मुसक्या आवळण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव आहे. १० नोव्हेंबर २०२३ रोजी उपनगर हद्दीतील आम्रपाली झोपडपट्टीमध्ये संशयित रोशन काळे, मॉन्टी काळे, प्रदीप सोनवणे यांनी फिर्यादी गौतम भगत यांच्या भावावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेपासून संशयित रोशन फरार होता. उपनगर पोलिसांसह गुन्हेशाखेची पथके त्याचा शोध घेत होते.

गुंडाविरोधी पथकाला संशयित निलगिरी बाग परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांनी रोशनला अटक करण्यासाठी निलगिरी बाग परिसरातील म्हाडा वसाहतीमध्ये सापळा रचला होता. (latest marathi news)

गुरुवारी (ता. २१) पहाटेच्या सुमारास रोशन आला असता, दबा धरून असलेल्या पथकाने त्यास पाठलाग करीत अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे असा ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हत्यार बाळगल्याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करून संशयिताला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT