Mahesh Pandurang Shingade esakal
नाशिक

Nashik Crime News : तडीपार संशयिताचा राहत्या घरात झोपेत मित्रांनी केला खून

Crime News : गंजमाळ पंचशीलनगर येथील पांडुरंग शिंगाडे काकाच्या दशक्रिया विधीसाठी शहरात आला होता. जागरणाचा कार्यक्रम संपन्न होऊन तो राहत्या घरी झोपेत होता अन...

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : तडीपार संशयीताचा राहत्या घरात झोपेत तिघा संशयितांनी खून केला. शुक्रवार (ता.५) पहाटेच्या सुमारास गंजमाळ पंचशीलनगर येथे घटना घडली. पांडुरंग उर्फ पांड्या हनुमंत शिंगाडे असे मृत तरुणाचे नाव आहे. (Nashik Crime Tadipar suspect killed by his friends)

गंजमाळ पंचशीलनगर येथील पांडुरंग शिंगाडे काकाच्या दशक्रिया विधीसाठी शहरात आला होता. जागरणाचा कार्यक्रम संपन्न होऊन तो राहत्या घरी झोपेत होता. त्याच्या शेजारी त्याचा भाऊ विकास शिंगाडे हा देखील झोपलेला होता. शुक्रवार (ता.५) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास तिघे संशयितांनी त्यांच्या घरात जाऊन मृत पांडुरंग यास कोयता आणि चॉपरने मारहाण केली.

भावाचा आवाज येत असल्याने विकास जागा झाला. त्याचा ओळखीचा संशयित कैलास गायकवाड कोयत्याने, दुसरा संशयित चॉपरने त्यास मारहाण करत होते. तर त्यांचा तिसरा सहकारी याने पांडुरंग यास पकडून ठेवल्याचे विकास याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्यांची भाची घरात आली.

संशयित कैलास गायकवाड यांनी तिला धक्का देत मुख्य दरवाजातून पळ काढला. अन्य दोघा संशयीतांनी घराच्या मागील खिडकीतून उड्या घेऊन फरार झाले. दरम्यान मृताच्या भावाने त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी त्यास कोयत्याने मारण्याची धमकी दिल्याने तो भावास वाचवू शकला नाही.

त्यांची मावशी आणि परिसरातील रहिवाशांनी पांडुरंग यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरनी तपासून मयत घोषित केले. संशयित पळ काढत असताना हातात चॉपर असलेल्या संशयीतास भाचीने ओळखले. निखिल सच्चे असे संशययीताचे नाव असून तो पांडुरंग याचा मित्र असल्याचे सांगितले. (latest marathi news)

घरात जाऊन खून केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. विकास शिंगाडे यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात कैलास गायकवाड, निखिल सच्चे आणि त्यांचा अन्य एक सहकारी तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस त्या दिशेने तपास करत आहे.

दोन महिन्यापूर्वी तडीपारी

मयत पांडुरंग शिंगाडे सराईत गुन्हेगार होता. ५ मे रोजी त्यास दोन वर्षासाठी शहर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. दशक्रिया विधीसाठी गुरुवार (ता.४) रोजी रात्री तो घरी आला होता. दरम्यान काही मित्रांबरोबर त्यांने जेवण करून घरी जाऊन झोपला. संशयितांनी घरात येऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केला. शहराबाहेर राहिला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता.

गुन्हेगारांची वाढली हिम्मत

शहरात विशेषतः जुने नाशिक परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी फोफावली आहे की, चक्क संशयित घरात जाऊन खून करत आहेत. काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्याच्या वादातून नाईकवाडीपुरा येते एकाचा खून झाला होता. ती घटना ताजी असतानाच गंजमाळ येथे एकाचा घरात घुसून खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसून त्यातून गुन्हेगारांची हिंमत वाढल्याने असे प्रकार घडत असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Latest Marathi News Updates : ससून डॉक वाचवा; कोळी बांधवांचा हक्क जपा!

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Heavy Rain in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे नव्या खड्ड्यांची भर, मार्ग काढणेही अडचणीचे

SCROLL FOR NEXT