Weapons seized from two people from Mhasrul area. Along with the team of Unit One of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : म्हसरुळमध्ये दोघांना कोयत्यासह अटक

Crime News : म्हसरुळ येथील भाजी मार्केटमध्ये कोयता बाळगून फिरणाऱ्या दोघांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : म्हसरुळ येथील भाजी मार्केटमध्ये कोयता बाळगून फिरणाऱ्या दोघांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. संशयितांकडून तीन कोयते, एक चाकू व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. (Nashik Crime Two arrested with Koyta in Mhasrul)

धनराज गोकुळ लांडे (रा. मखमलाबाद लिंकरोड, म्हसरुळ), हर्षल राजू मोंढे (रा. दिंडोरी रोड, म्हसरुळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार देविदास ठाकरे यांना दोघा संशयितांची खबर मिळाली होती. त्यानुसार, पथकाने सोमवारी (ता. १५) म्हसरुळ येथील भाजी मार्केटमध्ये फिरणाऱ्या या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला कोयते व चाकू आढळून आला. पथकाने दोघांकडून तीन कोयते, एक चाकू व यामाहाची दुचाकी (एमएच १५ जेके ६५९८) असा ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करून म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)

सदरची कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन इंगळे, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, रमेश कोळी, शरद सोनवणे, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, अप्पा पानवळ, राजेश राठोड, किरण शिरसाठ, नाझीम पठाण यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : फडणवीस-शिंदे वेगळे लढणार! भाजपच्या मंत्र्यांनीच दिला मोठा इशारा

Thane News: कल्याणमध्ये मंगळवारी पाणीबाणी! ९ तास पाणीपुरवठा बंद

Shocking Crime : संतापजनक ! आईच्या प्रियकराचा ८ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नशेच्या गोळ्या दिल्या अन्...

Dmart Sale : डीमार्ट तुम्हाला लुटतंय? DMart बाहेर आईस्क्रीम,पॉपकॉर्न विकणारे कोण असतात माहितीये? हे सिक्रेट पाहा नाहीतर खिसा होईल रिकामा

AI Career: AI मध्ये करिअर करायचंय? ऑस्ट्रेलियातील टॉप युनिव्हर्सिटीजची यादी येथे पहा!

SCROLL FOR NEXT