Crowd of women gathered in front of RBL Bank near Myco Circle. Also women gathered at State Bank of India in Panchvati esakal
नाशिक

Ladki Bahin Yojana : पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींची झुंबड! शासकीय बँकांबाहेर महिलांच्या रांगा; खात्यावरील पैसे मिळवताना दमछाक

Latest Nashik News : बँकेबाहेर महिलांच्या रांगा लागल्या असून, तासनतास उभे राहावे लागत असल्याने महिलांची अडचण होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा चौथा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्याने पैसे काढण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली आहे. बँकेबाहेर महिलांच्या रांगा लागल्या असून, तासनतास उभे राहावे लागत असल्याने महिलांची अडचण होत आहे. (crowd of ladki bahin to withdraw money)

नाशिक जिल्ह्यातील १४ लाख ७५ हजारांवर महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. राज्य सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार महिलांनी ऑफलाइन व ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करत या योजनेत सहभाग घेतला.

राज्य सरकारने १५०० रुपये महिना याप्रमाणे पहिल्या तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये एकरकमी बँक खात्यात जमा झाले. त्यानंतर ऑक्टोबर व नोव्हेंबरचे तीन हजार रुपयेही महिलांना प्राप्त झाल्याने एकूण साडेसात हजार रुपये बँक खात्यात आले आहेत.

खात्यातील पैसे काढण्यासाठी महिलांनी बँकेसमोर एकच गर्दी केली. मायको सर्कल जवळील आरबीएल बँकेसमोर गेल्या चार ते पाच दिवसांपासून रांगा लागल्या आहेत. महिलांना रांगेत उभे करण्यासाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी लागली.

तसेच पंचवटीतील महापालिकेच्या पंडितराव खैरे विभागीय कार्यालयासमोरील स्टेट बँक ऑफ इंडिया (एरंडवाडी) शाखेतही महिलांची गर्दी झाली. त्यामुळे बँक प्रशासनावर कामाचा ताण वाढला असून, महिलांना स्वतःच्या खात्यावरील पैसे काढताना दमछाक होत आहे. (latest marathi news)

अर्ज प्रक्रिया बंद

लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबरपासून बंद झाली आहे. ऑनलाइन व ऑफलाइन कुठल्याही स्वरूपाचे अर्ज स्वीकारले जात नसल्याचे महिलांनी सांगितले. अंगणवाडी सेविकाही हे अर्ज स्वीकारत नसल्याने महिलांमध्ये नाराजी वाढली आहे.

"दोन तास रांगेत उभे राहिल्यानंतर बँकेतून पैसे मिळाले. लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे वर्ग केले. पण खात्यातून काढण्यासाठी जास्त वेळ लागतो."- वंदना डेमसे, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT