मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

Swami Anand Swaroop : आता काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरुप यांनी ठाकरे बंधूंवर आक्षेपार्ह शब्दात टीका केलीय. स्वामी आनंद स्वरुप यांनी केलेल्या टीकेनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Swami Anand Swaroop Hindi speech Mumbai Thackeray response
Swami Anand Swaroop Hindi speech Mumbai Thackeray responseEsakal
Updated on

महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर आता मराठी विरुद्ध हिंदी असा नवा वाद उफाळून आलाय. मराठी न बोलल्यानं मनसे सैनिकांनी एका दुकानदाराला मारहाण केली. तर एका उद्योजकानं थेट राज ठाकरेंनाच एकेरीत मराठी शिकणार नाही काय करणार बोल असं आव्हान दिलं. त्यानंतर आता काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरुप यांनी ठाकरे बंधूंवर आक्षेपार्ह शब्दात टीका केलीय. आज मराठीच्या मुद्द्यावर विजयी मेळावा होत असून ठाकरे बंधू १८ वर्षांनी एकत्र येत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वामी आनंद स्वरुप यांनी केलेल्या टीकेनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com