Sharad pawar , Uddhav thackeray, Balasaheb thorat
Sharad pawar , Uddhav thackeray, Balasaheb thorat esakal
नाशिक

Lok Sabha Election 2024 : धुळे लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीकडून मात्र उमेदवाराची अद्याप घोषणा करण्यात आली नाही. कॉंग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व धुळे येथील कॉंग्रेस नेते श्‍याम सनेर यांच्या नावाची चर्चा आहे. आघाडीची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडते याबाबत उत्सुकता आहे. आघाडीत धुळे लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. (Nashik Curious about Maha Vikas Aghadi candidate for Dhule Lok Sabha)

धुळे मतदारसंघातून गेल्या पंधरा वर्षापासून भाजपचा उमेदवार निवडून येत आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडून यावेळी इच्छूकांची संख्या मोठी होती. डॉ. भामरे यांचे नाव राज्यातील पहिल्याच यादीत जाहीर झाल्याने इच्छूकांचा हिरमोड झाला.

सध्या डॉ. भामरे यांच्या उमेदवारीला सोशल मिडीयातून मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविला जात आहे. चार दिवसापूर्वी येथील मोसम चौकात फ्लेक्स लावून डॉ. भामरे यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अज्ञात व्यक्तीने लावलेला हा फलक तत्काळ हटविण्यात आला असला तरी ही चर्चा मतदारसंघासह राज्यभर पसरली.

त्यातच उमेदवार बदलण्यासंदर्भात भाजप पक्षश्रेष्ठींना मोठ्या प्रमाणावर ई-मेल पाठविले जात आहेत. काही इच्छूकांना अजूनही त्यांची उमेदवारी बदलली जाईल अशी अपेक्षा आहे. (latest marathi news)

यातून भाजप व महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होते. चर्चांकडे दुर्लक्ष करत डॉ. भामरे व त्यांच्या समर्थकांनी मात्र गाठीभेटी व प्रचाराचे नियोजन सुरु केले आहे.

महाविकास आघाडीकडून डॉ. तुषार शेवाळे व श्‍याम सनेर यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. असे असले तरी कॉंग्रेस नेतृत्व आणखी पर्याय शोधत असल्याची चर्चा आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यापैकी कोण गळाला लागते काय याचीही चाचपणी केली जात असल्याचे समजते.

एमआयएमकडून मालेगाव मध्यचे विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र उमरासाठी (मक्का-मदिना) गेलेल्या मौलाना मुफ्ती यांनी निवडणूक लढविण्याची शक्यता तूर्त तरी फेटाळून लावली आहे. उमराहून आल्यानंतर त्यांची भूमिका आणखी स्पष्ट होवू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT