samruddhi mahamarg esakal
नाशिक

Nashik Samruddhi Mahamarg: ऑक्टोबरपासून ‘समृद्धी’वर अखंड प्रवास : दादा भुसे; नागपूर ते मुंबई 701 किमी महामार्ग होणार खुला

Nashik News : इगतपुरी ते आमने या मार्गावरील वाहतूक सप्टेंबरअखेर सुरू करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Samruddhi Mahamarg : भारतीय जनता पक्ष सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे इगतपुरी ते आमने या मार्गावरील वाहतूक सप्टेंबरअखेर सुरू करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. त्यामुळे मुंबई ते नागपूर हा संपूर्ण प्रवास समृद्धी महामार्गाने होण्यास लवकरच सुरवात होणार आहे. (Uninterrupted journey on Samruddhi mahamarg from October)

नागपूर-मुंबई या दोन शहरांना जोडणाऱ्या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम चार टप्प्यांत पूर्ण करण्यात आले. तिसऱ्या टप्प्याचे उद्‌घाटन (भरवीर ते इगतपुरी) सार्वजनिक बांधकाममंत्री भुसे यांच्या हस्ते ४ मार्च २०२४ ला झाले. यात इगतपुरी तालुक्यातील २४ किलोमीटर मार्ग हा एकूण १६ गावांतून जातो. या तिसऱ्या टप्प्याचा खर्च सुमारे एक हजार ७८ कोटी असून, या लोकार्पणामुळे ७०१ किलोमीटरपैकी आता एकूण ६२५ किलोमीटर समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झाला आहे.

उर्वरित मार्गाचे (इगतपुरी ते आमने) काम प्रगतिपथावर असून, या महामार्गामुळे ठाणे व मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ तसेच जलद होणार आहे. तसेच, भिवंडीपासून इगतपुरीपर्यंत नाशिक मार्गावर होणारी वाहतूक कोंडीही कमी होईल.

घोटी-सिन्नर मार्गावर वाहनधारकांच्या प्रवासातील तब्बल दीड तास वाचणार आहे. त्यामुळे इगतपुरीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गावर जाता येईल. समृद्धी महामार्गाने नागपूर येथून आलेल्या वाहनांना थेट इगतपुरीपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. (latest marathi news)

अखेरच्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले. कल्याणजवळील एका उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, ते पूर्ण होताच हा रस्ता वाहनांसाठी खुला होईल, अशी माहिती पालकमंत्री भुसे यांनी नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्‍नासंदर्भात बोलावलेल्या उद्योजकांच्या बैठकीत दिली.

वाहतूक कोंडी सुटणार

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिकदरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे टोलबंदी करण्याची उद्योजकांची मागणी असून, हा विषय थेट न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. यात सार्वजनिक बांधकाममंत्री भुसे यांनी मध्यस्थी केली. परंतु, समृद्धी महामार्ग पूर्णत: खुला झाल्यावर तरी वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT