Death News esakal
नाशिक

Nashik Fire Accident : आगारीत तुपाऐवजी पेट्रोल टाकल्याने भाजल्याने मृत्यू; सिडकोतील घटनेने सर्वत्र हळहळ

Latest Nashik News : आगारी देताना तुपाऐवजी पेट्रोल टाकल्यामुळे लागलेल्या आगीत एका ६७ वर्षीय नागरिकाचा भाजल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २९) घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात.

सकाळ वृत्तसेवा

सिडको : येथील गुलमोहर कॉलनी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये पूर्वजांचे श्राद्ध घालत असताना आगारी देताना तुपाऐवजी पेट्रोल टाकल्यामुळे लागलेल्या आगीत एका ६७ वर्षीय नागरिकाचा भाजल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २९) घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात. दिनकर मार्तंड काळे (वय ६७, रा. गणेश एट्रिया अपार्टमेंट, गुलमोहर कॉलनी, डीजीपीनगर दोन) असे मृताचे नाव आहे. (Death due to burns caused by petrol)

सध्या पितृपक्ष सुरू असल्याने सर्वत्र पितरांचे श्राद्ध घातले जाते आहेत. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास काळे आगारी टाकत असताना आहुतीत तुपाऐवजी पेट्रोल टाकले असता आगीचा भडका झाला आणि काळे यांचे तोंड व शरीर भाजले.

तत्काळ कुटुंबीयांसह इमारतीतील नागरिक जमा झाले. ते गंभीर भाजल्याने त्यांना मुंबई नाका येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असताना दुपारी चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सामाजिक कार्यकर्ते शुभम मटाले यांनी या संदर्भात माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT