Women buying maat from maat sellers in Dodheshwar Naka area of ​​Satana.
Women buying maat from maat sellers in Dodheshwar Naka area of ​​Satana. esakal
नाशिक

Nashik News : कसमादे पट्ट्यात नक्षीदार, रंगीबेरंगी माठांना मागणी! गुजरात, मध्यप्रदेशातील व्यावसायिक विक्रीसाठी दाखल

गोविंद अहिरे

नरकोळ : उन्हाच्या झळा वाढू लागल्याने‎ माठांना मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील ठराविक गावांमध्ये माठ बनवत असले तरी बाजारात ऐनवेळी उपलब्ध होणाऱ्या गुजरात, मध्यप्रदेश या भागातील माठ, लाल, काळ्या रंगाचे माठ,‎ नळ लावलेले माठ बाजारात‎ विक्रीसाठी दाखल झाले आहेत.‎ याशिवाय नक्षीदार, रंगीबेरंगी माठही‎ शहरात विक्रीकरिता दाखल झाले‎ आहेत. (Nashik Demand for embroidery colorful matka in Kasmade belt Listed for commercial sale in Gujarat Madhya Pradesh marathi news)

सध्या उन्हाची दाहकता‎ वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर‎ विक्री होत असून माठाच्या आकारानुसार १००‎ रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत माठ‎ विक्रीस आहेत. लाल माती व काळ्या‎ मातीपासून बनवण्यात आलेले माठ‎ थंड पाण्यासाठी स्वस्त पर्याय मानले‎ जातात.

उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी गार पाण्याची आवश्यकता असते. यातच गारवा नैसर्गिक आणि मातीचा गोडवा देणारा असेल तर त्याला अधिकच महत्व आहे. म्हणूनच गरिबाचा फ्रिज अर्थात मातीच्या माठांना आजही महत्व टिकून आहे.

उन्हाच्या तीव्रतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने गरिबाचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंगीबिरंगी नक्षीदार माठ्यांबरोबर लाल आणि काळ्यामाठाना यंदा मोठ्या प्रमाणात मागणी आहे‎. माठ‎ थंड पाण्यासाठी स्वस्त पर्याय मानले‎ जातात.

माठातील पाण्याची चवच न्यारी

उन्हाची तीव्रता वाढताच माठातील पाण्याची उन्हाळ्यात आवश्यकता असते. फ्रीजमधील पाणी घेतल्यानंतर पुन्हा पुन्हा पाणी प्यावे, असे वाटते. परंतु, माठातील पाणी एकदा पिल्यानंतर सर्वोत्तम मानले जाते व तहान पूर्ण होते. मातीत विविध गुणधर्म असतात म्हणून माठातील पाण्याची चव न्यारीच असते. . (latest marathi news)

काय आहेत माठाच्या किंमती

काळा माठ : मोठा ४०० रुपये

मध्यम : ३०० रुपये

छोटा : १५० रुपये

लाल माठ : मोठा ३५० रुपये

छोटा : ३०० रुपये

नक्षीदार, रंगीबेरंगी डिझाईन : २००, २५०, ३५०, ४००

कोठून येतात माठ

लाल, काळा, मध्यप्रदेश तर नक्षीदार डिझाईनचे अहमदाबाद, गुजरात

ग्रामीण भागातील माठांनाही मागणी

बागलाण तालुक्यातील मुजंवाड, जायखेडा, विरगाव, डांगसौंदाणे, अंतापूर आदी गावातील कुंभार बांधवांकडून तयार होणाऱ्या मातीच्या माठांनाही मागणी आहे.

"गेल्यावर्षीप्रमाणे यंदा माठाच्या किमती स्थिर असून, उन्हाची तीव्रता वाढतच आहे. त्यानुसार माठाची विक्री होत आहे. नक्षीदार, रंगीबेरंगी माठांबरोबरच काळ्या व लाल माठांना मागणी आहे."- सुशीलकुमार पाल, माठ विक्रेते, सटाणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT