Mirabai Patil selling potatoes at the Mahatma Phule vegetable market here. esakal
नाशिक

Nashik News : बटाटा यंदा महागला! आवक कमी, मागणी वाढल्याने दरात वाढ

Nashik : येथील भाजीपाला बाजारात बटाट्यांची मागणी वाढली आहे. आवक कमी झाल्याने दरातही मोठी वाढ झाली.

जलील शेख

Nashik News : येथील भाजीपाला बाजारात बटाट्यांची मागणी वाढली आहे. आवक कमी झाल्याने दरातही मोठी वाढ झाली. लग्नसराई व बटाट्यांचे वेफर्स, चकल्या तयार करण्याचा सिझन आहे. त्यामुळे गेल्या वर्षी २० रुपये किलोने मिळणारा बटाटा सध्या ३५ ते ४० रुपये किलोने मिळत आहे. यंदा २० टक्क्यांनी मागणी वाढली असून दरातही वाढ झाली आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात या तीनही राज्यात बटाट्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ( demand for potatoes has increased in vegetable market )

महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील आग्रा येथील बटाटा विक्रीस येत आहे. येथे रोज ५० ते ६० टन बटाट्याची विक्री होते. शहरापेक्षा कसमादे परिसरात बटाट्याला मागणी आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा २० टक्क्यांनी उत्पादन घटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बाजारात बटाट्यांची आवक कमी झाली आहे. २०२२ मध्ये १४ रुपये किलो तर २०२३ मध्ये बटाटा घाऊक बाजारात १६ रुपये किलोने विकला गेला.

सध्या येथे ३५ रुपये किलोने बटाट्याची विक्री होत आहे. येथे आग्रा, डिसा, विजापूर, इंदूर या राज्यातील बटाटा हंगामानुसार येत असतो. जानेवारी महिन्यात मध्यप्रदेश तर फेब्रुवारी, मार्चमध्ये गुजरात येथील, मार्च ते डिसेंबरपर्यंत उत्तर प्रदेशातील बटाटा विक्रीसाठी येत असतो. आग्रा येथील बटाटा खाण्यासाठी रवेदार व चवदार असल्याने त्याला मागणी असते.  (Latest Marathi News)

गुजरात येथील बटाटा खातांना गोड लागतो. त्यामुळे असंख्य ग्राहक आग्राच्या बटाट्याला आवर्जून पसंती देतात. बटाट्यांमध्ये ख्याती, पोखराज, मोहन, संगम, सूर्या, २००१ यांसह विविध प्रकारच्या जाती आहेत. पंजाब, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बटाट्यांचे उत्पादन होते. महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या बटाट्याला पसंती दिली जाते.

''बटाट्यच्या उत्पन्नात गतवर्षीपेक्षा यंदा २० टक्क्यांनी घट झाली आहे. अनेक व्यापारी बटाटा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतात. परंतु यंदा उत्पादन घटल्याने स्टोरेज करण्याकरिता बटाटा शिल्लक नाही. त्यामुळे बटाट्याच्या किंमती वाढल्या आहेत.''- दीपक पाटील, घाऊक व्यापारी, शिवनेरी ॲन्ड कंपनी, मालेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकायचेत! वैभव सूर्यवंशीने सांगितली भविष्यातील ६ मोठ्या स्वप्नांची यादी; नंबर-१ पाहून चाहतेही चक्रावले

SCROLL FOR NEXT