NMC Nashik news esakal
नाशिक

मोठ्या थकबाकीदारांच्या घरासमोर ‘Nashik Dhol’; 15 सप्टेंबरपासून मोहीम

विक्रांत मते

नाशिक : घरपट्टी व पाणीपट्टीची अपेक्षित थकबाकी वसूल होत नसल्याने उद्दिष्टपूर्तीसाठी कर विभागाने पुन्हा मोठ्या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बडविण्याचे जुने हत्यार बाहेर काढले आहे.

दरवर्षी ढोल बजावण्याचा फंडा वापरण्याची घोषणा होते, मात्र प्रत्यक्षात कृती होत नाही. त्यामुळे विविध कर विभागाची ही कृती फक्त घाबरवण्यासाठी असल्याची सवय थकबाकीदारांना झाली आहे. (Nashik Dhol in front of water bill property tax arrears house campaign starts by NMC from September 15 nashik latest marathi news)

महापालिकेकडून मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीचे दरवर्षी उद्दिष्ट दिले जाते. या वर्षीदेखील दीडशे कोटींचे उद्दिष्ट आहे. जवळपास ८२ कोटी रुपये मालमत्ता करापोटी महापालिकेच्या तिजोरी आले. परंतु, सदर रक्कम वसूल होण्यासाठी महापालिकेला सवलत योजना जाहीर करावी लागली.

विविध कर विभागाकडून मालमत्ता कर अपेक्षित वसूल होत असल्याची पाठ थोपटली जात असली तरी थकबाकीदारांची व थकबाकी रक्कम वाढत असल्याची बाब दुर्लक्ष केली जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून मागील आठवड्यात घर व पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेण्यात आला.

त्यात ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असल्याची माहिती समोर आली. एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले ३२४५ थकबाकीदार असल्याची माहिती देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या. त्यास अपेक्षित उत्तर न मिळाल्यास १५ सप्टेंबरपासून थकबाकी वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर नाशिक ढोल वाजवण्याचा निर्णय घेतला आहे.

ढोल पथकासाठी निविदा प्रक्रिया

गणेशोत्सव व नवरात्रोत्सवानिमित्त ढोल पथकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यात नाशिक ढोलला संपूर्ण राज्यातून मागणी वाढत असताना आता महापालिकेने थकबाकी वसुली करण्यासाठी सहा विभागात ढोल पथक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आली आहे. ढोल वादन होत असताना त्याचे छायाचित्रणदेखील केले जाणार असून, जिओ टॅगिंग केली जाणार आहे.

असे आहेत विभागनिहाय थकबाकीदार

एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले ३२४५ थकबाकीदार शहरात आहे. पूर्व विभागात १०१५, पश्चिम विभागात ६४६, नाशिक रोड विभागात ४०५, सातपूर विभागात १९८, सिडको विभागात ३१६ तर पंचवटी विभागात ६३९ थकबाकीदार आहेत.

"मोठ्या थकबाकीदारांना अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास १५ सप्टेंबरपासून त्यांच्या घरासमोर ढोल वाजविण्याचा निर्णय घेतला आहे."

- अर्चना तांबे, कर उपयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT