Bharti Pawar and Bhaskar Bhagare  esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Nashik News : केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या समोर भास्कर भगरे यांनी कडवे आव्हान उभे करून लढतीत समान टक्कर आणली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

ओझर : दिंडोरी लोकसभा मतदार संघात दीड महिन्यांपासून सुरू असलेले लोकसभा निवडणुकीचे घमासान आज (ता.१९) सायंकाळी शमणार आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत निर्माण झालेली चुरस पाहता हा सामना कमालीचा फिरल्याने दोन्ही गटांनी कुठेही प्रचारात कुठलीच कसर सोडली नाही. (Dindori Lok Sabha Constituency)

त्यामुळेच केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या समोर भास्कर भगरे यांनी कडवे आव्हान उभे करून लढतीत समान टक्कर आणली आहे. त्यामुळे आता गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी बुधवारी (ता.१५) पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली त्याच्या काही तासांनी शरद पवार यांनी सभा घेत हम भी कुछ कम नही चा संदेश दिला.

दिंडोरी हा शेती बेल्ट असल्याने येथील व्यापारी पेठा या स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर फुलणाऱ्या असतात. त्यामुळेच गत पाच वर्षात शेतकऱ्यांची कशी हेळसांड होऊन शेतमालाला भाव दिला नसल्याचा ठपका महविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकांसमोर मांडला. तर पाच वर्ष त्यावर बेस तयार करून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसेल असे सांगत महायुती मतांचा जोगवा मागत आहे. (latest marathi news)

कांद्याभोवती फिरली निवडणूक

ज्या कांद्याने यापूर्वीही सत्तेच्या खुर्च्यांना सुरुंग लावले तोच कांदा यंदा तापला आहे. भारती पवार यांनीही त्यास अनेक ठिकाणी सामोरे जात गल्ली दिल्लीतला फरक समजावून सांगितला. तरी देखील आरोग्य यंत्रणा आणि सुविधा याबाबत त्यांना सपशेल उत्तर देता आले नाही. दुसरीकडे भगरे यांनी नेमके मुद्दे हेरत पूर्ण मतदार संघ पिंजून काढत लोकांनाच प्रश्न विचारून आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.

आमदार एकीकडे कार्यकर्ते दुसरीकडे

दिंडोरी कार्यक्षेत्रातील काही आमदारांचे कार्यकर्ते रोजीरोटीमुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचे चित्र आहे. अनेक जवळच्या लोकांचे म्हणणे एकच आहे. आमदारकीच्या वेळेस पाहू यंदा आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू द्या. या पवित्र्यामुळे आमदारही लोकसभा आणि विधानसभा या दोन्हींचा कल बघता सांभाळून घेण्याच्या मानसिकतेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT