Diploma Admission esakal
नाशिक

Diploma Admission : डिप्‍लोमा प्रवेश अर्जाची आता 9 जुलैपर्यंत मुदत; नोंदणीस मुदतवाढ देण्याचा ‘डीटीई’चा निर्णय

Nashik News : इयत्ता दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान/ वास्‍तुकला पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशप्रक्रियेत महत्त्वाची सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इयत्ता दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान/ वास्‍तुकला पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशप्रक्रियेत महत्त्वाची सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केली आहे. नोंदणीची मुदत संपत असताना ‘डीटीई’ने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्‍यानुसार आता ९ जुलैपर्यंत पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणी करून प्रवेशाच्‍या प्रक्रियेत सहभागी होता येईल. (Diploma admission application deadline now till 9th ​​July)

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राबवत असलेल्‍या या प्रवेशप्रक्रियेला गेल्‍या २९ मेपासून सुरवात झाली होती. प्रारंभी जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार बुधवार (ता. २५) पर्यंत ऑनलाइन नोंदणीची मुदत दिलेली होती; परंतु आणखी व्‍यापक स्वरूपात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावेत, कुणीही प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय ‘डीटीई’तर्फे घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना ९ जुलैपर्यंत संकेतस्‍थळाला भेट देताना प्रक्रिया पूर्ण करता येईल.

कागदपत्रांची पडताळणी आवश्‍यक

नोंदणीकृत विद्यार्थ्यांना आपल्‍या कागदपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी विद्यार्थ्यांना ई-स्‍क्रुटीनी व प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी असे दोन पर्याय उपलब्‍ध केले आहेत. (latest marathi news)

ई-स्‍क्रुटीनीद्वारे विद्यार्थी त्‍यांच्‍या स्‍तरावर सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करीत पडताळणी प्रक्रिया पूर्ण करू शकतील. प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी पर्याय निवडलेल्‍या विद्यार्थ्यांना सुविधा केंद्राला भेट देत प्रक्रिया पूर्ण करता येईल.

महत्त्वाच्‍या तारखा अशा

स्‍क्रुटीनी प्रक्रियेसाठी ९ जुलैपर्यंत मुदत असेल. सुधारित वेळापत्रकानुसार तात्‍पुरती गुणवत्ता यादी ११ जुलैला प्रसिद्ध होईल. यासंदर्भात तक्रार, हरकती नोंदविण्यासाठी १२ ते १४ जुलैदरम्‍यान मुदत असेल. यानंतर १६ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून, त्‍याआधारे कॅप राउंडची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT