Director General with Medal Awarded Police Officers Administrators Commissioner of Police Sandeep Karnik, Deputy Commissioner Prashant Bachhav, Kiran Kumar Chavan, Monica Raut etc. esakal
नाशिक

Nashik News : पोलिस महासंचालक पदकप्राप्त अधिकारी-अंमलदारांचा सन्मान!

Nashik News : पोलिस दलामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या पोलिस अधिकारी-अंमलदारांना जाहीर करण्यात आलेल्या पोलिस महासंचालक पदक महाराष्ट्रदिनी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पोलिस दलामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी-अंमलदारांना जाहीर करण्यात आलेल्या पोलिस महासंचालक पदक महाराष्ट्रदिनी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. नाशिक शहर, ग्रामीण, कारागृह पोलिस दलात वैशिष्ट्यपूर्ण कर्तव्य बजाविणाऱ्या ४१ अधिकारी-कर्मचाऱ्यांना महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले. (Director General of Police Medal Award)

त्यामध्ये नाशिक गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य चंद्रकांत गवळी, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त गीता चव्हाण, नाशिक ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी बाबुराव दडस यांसह नाशिक शहरचे पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, ग्रामीणचे निरीक्षक रघुनाथ शेगर, सत्यजित आमले, शहरचे उपनिरीक्षक नारायणगीर गोसावी, सहायक उपनिरीक्षक विजय आहेर.

विजय लभडे, विजय कडाळे, ललितकुमार केदारे, ग्रामीणचे दिलीप पगार, पंढरीनाथ टोपले, सुहास छत्रे यांचा समावेश होता. तसेच शहरचे अंमलदार बाळासाहेब मुर्तडक, सुरेश सोनवणे, आशा सोनवणे, काशिनाथ बागूल, मनोहर नागरे, चंद्रकांत गवळी, शरद आहेर, अनिल लोंढे, नंदकुमार नांदुर्डीकर, दत्तात्रय खैरे, महेश साळुंके, कैलास महाले, किशोर ठाकूर. (Latest Marathi News)

महेश नांदुर्डीकर, विशाल काठे, श्रीकांत कर्पे, विशाल जोशी, महाराष्ट्र पोलिस अकादमीतील अंमलदार संजय निफाडे, संजय पाटील, रंगराव ईशी, विठ्ठल खेडकर, नाशिक गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयातील अंमलदार विनोद पाटील, ग्रामीणचे प्रवीण काकड, कैलास मुंढे, अमोल घुगे, नितीन डावखर, योगेश पाटील, मध्यवर्ती कारागृहातील उपअधीक्षक सचिन चिकणे, हवालदार किरण पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले.

शहर पोलीस आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित सोहळ्याप्रसंगी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत यांच्यासह सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक सहायक निरीक्षक धर्मराज बांगर यांनी केले. सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

तिला स्मशानात जळायचं नव्हतं... आईच्या गूढ मृत्यूबद्दल पहिल्यांदाच बोलली पूजा बेदी; म्हणाली, 'ती अचानक गायब झाली...

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT