Honorable while distributing educational materials to normal children with disabilities. esakal
नाशिक

Nashik News : दिव्यांगांच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Nashik News : ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अँड‌ डिझॅबल्ड या संस्थेतर्फे हार्ट इन्स्टिट्यूट येथे दिव्यांग व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अँड‌ डिझॅबल्ड या संस्थेतर्फे डॉ. हेलेन केलर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. 27) साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट येथे दिव्यांग व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ व एमएसएल ड्राईव्ह लाइन सिस्टीम कंपनीचे पर्सनल मॅनेजर हेमंत राख उपस्थित होते.

दोन्ही पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्था राबवीत असलेल्या उपक्रमांची माहिती करून घेतली व आपणदेखील संस्थेला सर्वतोपरी मदत करू असे सांगितले. तसेच पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष पाटील व विंचूरचे अशोक लोळगे व परिवार यांनीदेखील शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन उपक्रमासाठी आर्थिक मदत केली.

याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, कृष्णकुमार चावरे, विद्या जगताप, नीमिता शेजवळ आदी उपस्थित होते. (latest marathi news)

संस्थेचा परिचय अध्यक्ष विकास शेजवळ यांनी केला, तर सूत्रसंचालन महासचिव रामदास जगताप यांनी केले. मानद अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले व 110 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य जसे वह्या.

दप्तर, कंपास, पेन्सिल, वॉटरबॉटल आदी वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वितेसाठी गोरख पठारे, श्रीपत मोगल व साई बाबा हार्टचे कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT