Helmet Distribution esakal
नाशिक

Nashik News : विनाहेल्मेट चालकांना हेल्मेटचे वाटप; शहर वाहतूक शाखा-फिजिक्स क्लासचा संयुक्त उपक्रम

Nashik News : गुरुवारी (ता. २३) दुचाकीस्वारांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी शहर वाहतूक शाखा आणि फिजिक्स क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने विनाहेल्मेट चालकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील वाढते अपघात आणि त्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे प्राणाकिंत अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतुकीचे नियम पाळतानाच हेल्मेटचा वापरही दुचाकीस्वारांना करावा, यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलीस शाखेकडून मोहीम राबवून कारवाई केली जाते. त्याअंतर्गत गुरुवारी (ता. २३) दुचाकीस्वारांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी शहर वाहतूक शाखा आणि फिजिक्स क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने विनाहेल्मेट चालकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. (Nashik Distribution of helmets to helmetless drivers)

नाशिक शहर वाहतूक पोलीस शाखा आणि फिजिक्स क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. २३) गंगापूर नाका येथे विनाहेल्मेट चालकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

नाशिक शहर वाहतूक पोलीस शाखा आणि फिजिक्स क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. २३) गंगापूर नाका येथे विनाहेल्मेट चालकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर वाहतूक शाखा विभाग दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, उपनिरीक्षक कांडेकर, हवालदार माळेगावे, हवालदार बागुल, फिजिक्सवाला क्लासेसतर्फे रवी थोरात, राजेश मिश्रा आदी उपस्थित होते. (latest marathi news)

यावेळी सुमारे १५० दुचाकीस्वारांना हेल्मेट प्रदान करण्यात आले. तसेच, यावेळी दुचाकीस्वारांना भविष्यातील भीषण अपघातापासून बचाव करण्यासाठी हेल्मेट वापरबाबत समुपदेशन करण्यात आले. अशास्वरुपाची मोहीम शहरात ठिकठिकाणी राबविली जाणार आहे. तसेच, यावेळी बेशिस्त वाहनचालकांचेही समुपदेशन करण्यात आले. हेल्मेट मिळाल्यानंतर दुचाकीस्वारांनाही सुखद धक्का मिळाला. अनेकांनी पोलिसांच्या या उपक्रमांचे कौतूक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT