Satana Nagar parishad esakal
नाशिक

Nashik News : प्रत्येक प्रभागात थकबाकीदारांचे लागणार होर्डिंग! कर वसुलीसाठी सटाणा नगरपरिषदेचा निर्णय

Nashik News : अपेक्षित कर वसुलीसाठी आता सटाणा नगरपरिषदेने थकबाकीदारांवर थेट जप्तीची, मालमत्ता पत्रक व सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रशेखर भोसले यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : कर संकलनावरच नागरिकांना पालिकेतर्फे अत्यावश्यक सोयी सुविधा पुरविल्या जातात. मात्र जर अपेक्षित प्रमाणात कर वसुली न झाल्याने नागरिकांना मूलभूत सुविधा देताना प्रशासनास कसरत करावी लागते. मात्र अपेक्षित कर वसुलीसाठी आता सटाणा नगरपरिषदेने थकबाकीदारांवर थेट जप्तीची, मालमत्ता पत्रक व सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रशेखर भोसले यांनी दिली. (Nashik Satana Municipal Council tax collection marathi news)

सटाणा शहरातील मालमत्ताधारकांना घरपट्टी, पाणीपट्टीचे मागणीपत्र देण्यात आलेले असून, थकबाकीदारांना वेळोवेळी नोटिसाही बजावण्यात आलेल्या आहेत. तरी देखील काही मालमत्ता धारकांनी त्यांच्याकडे येणे असलेल्या कराचा भरणा अद्याप केलेला नाही. अशा थकबाकीदारांवर आता नगरपरिषदेने थेट जप्तीची व सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्याच्या कारवाईचा बडगा उगारला आहे.

पालिका मुख्याधिकारी श्री भोसले म्हणाले, की थकबाकीवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल ताशा वाजविणे, नळजोडण्या खंडित करणे मालमत्ता जप्ती वॉरंट बजावण्याची कार्यवाही देखील सुरु झाली आहे. परंतु यावर्षी पहिल्यांदाच नगरपरिषदेने थकबाकीदारांच्या थेट सातबारा उतारा व मालमत्ता पत्रकावर बोजा चढविण्याची कारवाई सुरु केली असून, थकबाकीदारांची नाव आणि थकबाकीची रक्कम यांचे बॅनर देखील प्रत्येक प्रभागात लावण्यात येत आहेत. (Latest Marathi News)

शासकीय अनुदान थांबण्याची शक्यता

शहर विकासाच्या विविध योजना राबवण्यासाठी मालमत्ता कर हा नगरपरिषदेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तर आहेच तथापी शासनाकडून मिळणाऱ्‍या १५ व्या वित्त आयोगाच्या भरघोस अनुदानासाठी किमान ९० टक्के कर वसुलीची अट असल्याने तसे झाले नाही तर, शासनाकडून मिळणारे अनुदानही रोखले जाणार आहे.

याचा विपरीत परिणाम शहर विकासावर होणार असल्याने नागरिकांनी त्यांच्याकडे येणे असलेला कराचा भरणा तत्काळ करून नगरपरिषदेस सहकार्य करावे व कटू कारवाई टाळावी असे आवाहनही मुख्याधिकारी श्री. भोसले यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT