Maize Crop  esakal
नाशिक

Nashik Monsoon Season : समाधानकारक पावसामुळे शेतमजुरांना रोजगार! मालेगाव तालुक्यात निंदणी, खुरपणी, फवारणीची लगबग

Nashik News : मालेगाव तालुक्यात पाऊस पडल्याने शेतातील पिके आनंदाने डोलताना दिसून येत आहे. शेतकरी राजाने मका, बाजरी, कपाशी या पिकांची पेरणी, लागवड केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मालेगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. यातून शेतीच्या कामांना गती मिळणार असून शेत मजुरांना शेतात निंदणी, खुरपणी, फवारणी या कामांची लगबग सुरू झाली आहे. शेतमजूर पुरुष व महिलांना पाऊस पडल्याने शेतातील कामावर जावे लागत आहे. यामुळे शेत मजुरांना सुगीचे दिवस येणार आहेत.( Employment for farm labourers due to satisfactory rain In Malegaon)

पाऊस पडल्याने शेतातील पिके आनंदाने डोलताना दिसून येत आहे. शेतकरी राजाने मका, बाजरी, कपाशी या पिकांची पेरणी, लागवड केली आहे. यापूर्वी पाऊस रिमझिम पडत असल्याने शेतात नुकसानदायक तणनिर्मिती झाली आहे. काही ठिकाणी मका पिकावर लष्करी अळीचे प्रमाण वाढले आहे.

यातून पिकाची निगा राखण्यासाठी शेतात निंदणी, फवारणी, खाद्य, युरिया टाकण्याचे काम शेतमजुरांना शेतात करावे लागत आहे. शेतातील मका पिकासाठी कोळपणी, नांगरणी करत पिकाची काळजी घेतली जाते. पाऊस पडल्याने शेतातील कामांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना शेत मजूरांची गरज भागत असते. ग्रामीण भागात महिलांचे शेत मजुरीचे प्रमाण जास्त दिसून येते. (latest marathi news)

ग्रामीण भागात शेतमजुरांना थेट घरापासून बांधापर्यंत रिक्षा, ट्रॅक्टर, पिकअप वाहनाने मजुरांना शेतात सोडावे लागते. ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी शेत मजूरीचे दर दोनशे ते चारशे रुपयापर्यंत घेतली जाते. परिसरात पाऊस समाधानकारक झाल्याने विहिर, नदी-नाल्यांना पाणी आले आहे. शेतातील पिकांची या पावसाने भूक भागली असून शेतकरी, शेत मजूर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

"पाऊस पडल्याने आमच्या सारख्या मजुरांना शेतात कामे मिळाली आहेत. शेतातील कोळपणी, फवारणी, नांगरणी हे कामे करण्यासाठी शेत मजुरांना शेतकरी प्राधान्य देतात. शेतमजुरांना पाऊस पडल्याने रोजगार मिळाला आहे." - दयाराम गायकवाड, शेतमजूर, टेहरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघर साधू हत्याकांडाचे आधी आरोप केले, आता पक्षात का घेतलं? CM फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपकडून प्रवेशाला स्थगिती

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

CM Devendra Fadnavis: मित्रपक्षांना शत्रू समजू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युती म्हणून एकत्र लढणार

Kolhapur News: कुरुंदवाडच्या रणांगणात कलाटणी! ठाकरे गट शाहू आघाडीसोबत; काँग्रेस ‘एकाकी’

Video Viral: वाहत्या पुरात हरीणाला हत्तीनं दिलं जीवनदान, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT