Evaluation file photo esakal
नाशिक

Nashik Educational News : राज्यात 4 ते 6 एप्रिलदरम्यान होणार संकलित मूल्यमापन चाचणी! वेळापत्रक जाहीर

Nashik News : येत्या ४ ते ६ एप्रिलदरम्यान तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची संकलित मूल्यमापन चाचणी होणार आहे.

विजय पगारे

इगतपुरी : राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन आणि परिणामांचे बळकटीकरण (स्टार्स) कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती निश्चितीसाठी संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार येत्या ४ ते ६ एप्रिलदरम्यान तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची संकलित मूल्यमापन चाचणी होणार आहे. (Nashik Evaluation held in state from April 4 to 6 marathi news)

प्रश्नपत्रिका, शैक्षणिक साहित्याचा होणार पुरवठा

एससीईआरटीच्या संचालकांच्या प्रस्तावानुसार राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापन चाचणीच्या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा होणार आहे.

"शालेय पातळीवरील विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती निश्चितीसाठी संकलित मूल्यमापन चाचणी चांगला उपक्रम आहे. या माध्यमातून विद्यार्थी प्रगतीत येणाऱ्या समस्या समजण्यास मदत मिळते. विद्यार्थीस्तर निश्चितीस शिक्षकांना योग्य संधी मिळते."

-डॉ. नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

(latest marathi news)

असे आहे संकलित चाचणीचे वेळापत्रक :

तारीख : विषय : इयत्ता

४ एप्रिल : मराठी : तिसरी ते आठवी

५ एप्रिल : गणित : तिसरी ते आठवी

६ एप्रिल : इंग्रजी : तिसरी ते आठवी

वेळ : तिसरी-चौथीसाठी : ९० मिनिटे

पाचवी- सहावीसाठी : ९० मिनिटे

सातवी-आठवीसाठी : १२० मिनिटे

गुण : तिसरी-चौथीसाठी : ३० गुण

पाचवी-सहावीसाठी : ४० गुण

सातवी-आठवीसाठी : ५० गुण

वेळापत्रकानुसार मराठी व गणित विषयासाठी सर्व माध्यमांचा समावेश आहे. इंग्रजी विषयासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळल्या आहेत. गुण आणि वेळ सर्व विषयांसाठी समान आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT