A banner created by an enthusiastic office bearer on the occasion of the beloved leader's birthday. esakal
नाशिक

Nashik News : लाडक्या नेत्यासाठी पदाधिकाऱ्याकडून जंगी नियोजन; वरिष्ठांनी नकार देताच कार्यक्रम रद्द

Nashik : आपल्या नेत्याला खुष करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी केव्हा काय करतील याचा काय नेम नाही, असाच काहीसा प्रकार नाशिक शहरात घडला.

प्रमोद दंडगव्हाळ

Nashik News : आपल्या नेत्याला खुष करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी केव्हा काय करतील याचा काय नेम नाही, असाच काहीसा प्रकार नाशिक शहरात घडला. सध्या लाडकी बहीण योजना सुरू केल्याने त्यासाठी अर्ज करण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. या योजनेला मिळत असलेली प्रसिद्धी लक्षात घेऊन आता स्थानिक स्तरावर देखील काही कार्यकर्ते व पदाधिकारी अशाच प्रकारचे अनोखे फंडे राबवू पाहत आहेत. ()

जेणेकरून त्याची प्रसिद्धी होईल व येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्याचा फायदा होईल. शहरातील एका उत्साही पदाधिकाऱ्याने नेत्याच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय वस्तू वाटप, लाडक्या बहिणींसाठी मोफत साडी, लाडके दाजी व जावई यांच्या पाहूणचारासाठी सोमरस व कोंबडी वाटप असे कार्यक्रमाचे आयोजन केले. तसा बॅनरही तयार केला. हा बॅनर सर्व व्हॉट्सॲप ग्रुप पाठविण्याचे नियोजन आखले. परंतु, एकदा ही गोष्टी वरिष्ठांना सांगावी म्हणून त्याने तयार केलेला बॅनर वरिष्ठांना पाठविला. (latest marathi news)

मात्र वरिष्ठांनी हे बॅनर पाहताच हा वादाचा विषय ठरू शकतो आणि हे प्रकरण अंगलट येईल असा निष्कर्ष वरिष्ठांना काढला आणि तसा निरोप उत्साही कार्यकर्त्याला दिला. वरिष्ठांचा निर्णय येताच पदाधिकाऱ्यांनी देखील कार्यक्रम काही कारणास्तव रद्द केला असल्याचे कार्यकर्त्यांना कळविले. ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाल्याचे कळताच उत्साही कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आणि सर्वांनी नाराजी पसरली. परंतु रद्द झालेल्या या कार्यक्रमाची चांगली चर्चा परिसरात रंगली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT