Water  esakal
नाशिक

Nashik News : दिंडोरी तालुक्यात साठवण बंधाऱ्यांची मागणी!

Nashik News : पंचायत समितीने गावपातळीवर साठवण बंधारे बांधावेत अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

दिंडोरी : तालुक्यातील अनेक गावांत सध्या तीव्र पाणीटंचाई असून ती दूर करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीने गावपातळीवर साठवण बंधारे बांधावेत अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यातील ढकांबे, तळेगाव दिंडोरी, खतवड,वरवंडी, राशेगाव, रामशेज, रडतोंडी. (farmers Demand for storage dams in dindori taluka)

तुंगलदरा, मानोरी तसेच पूर्व भागात सध्या तीव्र पाणीटंचाई असून टंचाई दूर करण्यासाठी या भागात साठवण बंधारे बांधल्यास पावसाळ्यात पाणीसाठा होऊन टंचाई दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल. तालुक्यातील अनेक गावांत आजही टँकरने पाणीपुरवठा होतो. निवडणुका संपल्या पुन्हा लोकांच्या जीवन मरणाचे विषय दुर्लक्षित राहतात.

दिंडोरी तालुक्याला नैसर्गिक वारसा लाभलेल्या असून ३५ ते ४० फूट खोलीचे नाले व नद्या आहेत. नदीपात्रात ठिक ठिकाणी साठवण बंधारे बांधले तर उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल.त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी उंचावली जाईल. (latest marathi news)

प्रत्येक गावात जर पाच ते सहा साठवण बंधारे बांधले तर नक्कीच पाणी टंचाई दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल.सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच चा-याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

संबंधित विभागाने लक्ष घालून ठिक ठिकाणी साठवण बंधारे बांधले तर उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल.ती त्वरित सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT