village has not had electricity for four days nashik sakal  sakal
नाशिक

नाशिक : मातोरी रोडवरील शेतकरी चार दिवसांपासून अंधारात

महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : म्हसरूळ एकीकडे पावसाने झालेले शेतीचे नुकसान, त्यातच मखमलाबाद मातोरी- रोडवरील डीपी क्रमांक १३ चार दिवसांपासून जळाल्याने जवळपास १५० ते २०० शेतकरी व इतर नागरिक अंधारात आहेत. याबाबत महावितरण कंपनीकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने शेतकरी हतबल झाले असून, या परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, टोमॅटो आदी शेतीला फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आधीच संकटात सापडला असून, आहे ते पीकही वीज नसल्याने हातातून निसटण्याची शक्यता आहे. मखमलाबाद- मातोरी रोडवरील डीपी क्रमांक १३ चार दिवसांपासून जळाली असून, महावितरण कार्यालयात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने या डीपीवरील जवळपास १५० ते २०० ग्राहक, शेतकरी अंधारात आहेत.

वीज नसल्याने शेतीचे कामही करणे अवघड झाले असून, औषध फवारणी तसेच इतर कामही खोळंबली आहेत. महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊनही ते दाद देत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याबाबत आमदार ॲड. राहुल ढिकले, नगरसेवक पुंडलीकराव खोडे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पिंगळे आदी लोकप्रतिनिधींनीही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनाही दाद दिली नसल्याचे येथील शेतकरी रमेश बाबा काकड यांनी सांगितले. दरम्यान, चार दिवसांपासून शेतीची कामे खोळंबली असून, अनेक लोक अंधारात आहेत. याबाबत महावितरण कंपनीने त्वरित दखल न घेतल्यास महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मखमलाबाद- मातोरी रोडवरील मखमलाबाद सोसायटीचे सभापती वाळू काकड, रमेश बाबा काकड व परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

Vaibhav Taneja : इलॉन मस्कच्या नव्या 'अमेरिका पार्टी'चा खजिनदार भारतीय वंशाचा; कोण आहे सीएफओ वैभव तनेजा?

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाने २५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; जुलैच्या पहिल्याच आठवड्यात 'इतका' पाणीसाठा

१०व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार नामांकनांची यादी जाहीर; कोण ठरणार सर्वोत्कृष्ट? 'या' चित्रपटांमध्ये चुरस

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

SCROLL FOR NEXT