Sinner Musalgaon Trimbak Plastic Company caught fire
Sinner Musalgaon Trimbak Plastic Company caught fire esakal
नाशिक

Nashik Fire Accident : सिन्नरमध्ये मुसळगावमधील त्रंबक प्लास्टिक कंपनीला आग; जीवितहानी नाही

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : येथील मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीतील त्रंबक प्लॅस्टिक कंपनीला शुक्रवारी (ता.५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आगीचे लोळ व धूर निघू लागले. त्यावेळी कामगारांनी बाहेर जात अग्निशमन दलाला पाचारण केले. जवानांनी अर्धा तास मेहनत घेत आग आटोक्यात आणली. या कंपनीत अॅक्रीलिक शीट तयार होतात. (Nashik Fire accident at Trimbak Plastic Company in musalgaon news)

अचानक या शीटला आग लागल्याने आग सर्व कंपनीत पसरली. कंपनीत आगीची भट्टी असून सुदैवाने मोठी घटना घडली त्यातच काही कळायच्या आत सर्वत्र धुराचे लोट दिसू लागले. कामगारांना आग लागल्याचे कळताच त्यांनी बाहेर पळ काढला. या दरम्यान तत्काळ मुसळगाव एमआयडीसी व माळेगाव एमआयडीसी तसेच सिन्नर येथून सिन्नर नगरपरिषदेचे अग्निशमन दलाला पाचारण केले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ या आगीवर नियंत्रण मिळवले. सुमारे अर्धा तासानंतर आग आटोक्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आगीमध्ये कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. मात्र प्लॅस्टिकने पेट घेतल्यामुळे परिसरात धुराचे लोळ दिसत होते. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे तसेच सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेत मदतकार्य केले. (latest marathi news)

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मागील काही महिन्यात मुसळगाव औद्योगिक वसाहत येथे एका कंपनीला आग लागली होती. या आगीत कंपनीचे खूपच आर्थिक नुकसान झाले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा यावेळी मुसळगाव एमआयडीसीत कंपनीला आग लागल्यामुळे पुन्हा सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीतील पदाधिकाऱ्यांनी तसेच मालक, कामगार यांच्या समवेत अग्निरोधक याविषयी एक कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेत आगीवर कसे नियंत्रण मिळावे, तसेच कारखान्यात आग लागू नये, यासाठी कारखान्यात काय सुविधा कशा असाव्यात याविषयी कार्यशाळा घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT