Car market and house fire Burnt bikes esakal
नाशिक

Nashik Fire Accident : वडाळा नाका येथे वाहन बाजार दुकानाला आग!

Latest Fire Accident news : वाहन बाजार लागलेल्या आगीत ५० दुचाकी आणि त्यास लागून असलेले पाच घरांसह चप्पलचे गोडाऊन आणि दोन दुकानांचे जळून नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : वडाळा नाका येथील नुरी चौकात आगेचा तांडव रहिवाशांना अनुभवास मिळाला. येथील वाहन बाजार लागलेल्या आगीत ५० दुचाकी आणि त्यास लागून असलेले पाच घरांसह चप्पलचे गोडाऊन आणि दोन दुकानांचे जळून नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. भारत नगर भागातील १५ घरांना आग लागण्याची घटना ताजी असतानाच सोमवार (ता.२२) सकाळी वडाळा नाका नुरी चौकात आग लागण्याची घटना घडली. (Nashik Fire at Wadala Naka vehicle market shop )

सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास येथील वाहन बाजार दुकानाला आग लागली. वाहनांमधील पेट्रोलने क्षणात आगेचा भडका उडाला. त्यात भंगर मालाची दोन दुकाने, चप्पलचे गोडाऊन यासह लागून असलेली पाच घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. वाहन बाजार दुकानातील विक्रीस असलेल्या ५० दुचाकीं तसेच भंगार दुकानातील, चप्पलच्या गोडाऊनमधील चपलांचा माल आणि दोन्ही घरातील संसार उपयोगी संपूर्ण साहित्य जळून मोठे नुकसान झाले.

परिसरातील नागरिकाच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशामक विभागास माहिती दिली. मुख्यालय येथील एक बंब अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाला. आगीचे प्रमाण अधिक असल्याने तसेच पेट्रोल मुख्यालयातील अतिरिक्त दोन बंब तसेच सिडको, सातपूर, पंचवटी, नासिक रोड, पंचवटी विभागीय अग्निशामक दल येथून प्रत्येकी एक एक बंब घटनास्थळी दाखल झाले.

नऊ बंबांच्या प्रत्येकी दोन फेऱ्या करून अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगेवर नियंत्रण मिळविले. वाहन बाजाराचे शटर बंद असल्याने अडचण निर्माण झाली. शटर तोडून आगीवर पाण्याचा मारा करत आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागील बाजूने दोन बंबांच्या साह्याने पाण्याचा मारा करण्यात आल्याने आग नियंत्रण करण्यात यश आले.

अग्निशामक मुख्यालयाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी, उपमुख्य अधिकारी पी.बी परदेसी लीडिंग फायरमन डी आर गाडे, किशोर पाटील, प्रदीप बोरसे, संतोष आगलावे, राजेंद्र मोरे, अनिल गांगुर्डे, सोमनाथ पगार, हर्षद पटेल, विजय मुसळे, सिद्धार्थ भालेराव, फायरमन विजय नागपुरे, मंगेश पिंपळे, शरद देटके, गणेश गायधनी, नाजीम देशमुख, अशोक सरोदे, बाळू पवार, श्री. काझी, गणपत धोत्रे, सुदाम सोनवणे आदींच्या अथक प्रयत्न तसेच सुदैवाने जीवितहानी टळली. सकाळच्या सुमारास आगीचे अग्नितांडव परिसरातील नागरिकांना अनुभवास मिळाल्याने त्यांच्यामध्ये भीती पसरली होती. आग आटोक्यात आल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

शॉर्टसर्किटमुळे आगीची घटना ?

परिसरातील वीज वितरण विभागाची वायर तुटून शॉर्टसर्किट झाला. त्यातून प्रथम वाहन बाजाराने त्यानंतर इतर दुकानांनी आणि घरांनी पेट घेतला. अशी चर्चा परिसरात सुरू होती. प्रत्यक्षात आगीचे कारण समजू शकले नाही.

''आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. घटनेचा पंचनामा आणि चौकशी करण्याचे कार्य सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच आगेचे निश्चित कारण समजू शकेल.''-संजय बैरागी अग्निशामक विभाग मुख्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT