Mobile shop damage due to fire esakal
नाशिक

Nashik Fire Accident : नांदगाव येथे मोबाईल दुकानाला आग! लाखो रुपयांचे नुकसान

Fire Accident : बोलठाण येथील हरिओम मोबाईल शॉप या दुकानास शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

अरुण हिंगमीरे : सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : तालुक्यातील बोलठाण येथील हरिओम मोबाईल शॉप या दुकानास शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील उमेश लालचंद दायमा यांच्या बस स्थानक परिसरात असलेल्या हरिओम मोबाईल शॉप या दुकानास शुक्रवारी पहाटेच्या सुमारास येथील काही तरुण व नागरिक मॉर्निंग वॉक साठी जात असतांना त्यांना वरील दुकानातून धुर निघत असल्याचे दिसून आले. (nashik fire caused loss of lakhs of rupees marathi news)

त्यांनी दुकानाचे संचालक उमेश दायमा आणि त्यांचे बंधू पत्रकार निलेश दायमा यांच्याशी संपर्क करुन परिस्थिती बाबत माहिती दिली. दायमा बंधू यांनी दुकानचे शटर उघडून नागरिकांच्या सहकार्याने आग विझवून आतील सामान बाहेर काढले.

यामध्ये मोबाईल रिपेअरींग साठी लागणारे साहित्य चार लाख, बेसीक फोन ५० नग, पन्नास हजार रुपयेचे जुने मोबाईल, एक लाख दहा हजार रुपये, लॅपटॉप आणि इतर मिशनरी दिड लाख, दुकानचे फर्निचर एक लाख रुपये असे आठ लाख दहा हजार रुपयाचे नुकसान झाले.

येथील तलाठी जयेश मलधोडे यांनी पंचांसमक्ष केलेल्या पंचनाम्यात असे म्हटले आहे. दुकानला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजलेले नसून वरील घटने बाबत वाच्यता होताच बोलठाण तसेच परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT