Potato truck caught fire on flyover in Lekhanagar.  esakal
नाशिक

Nashik Fire Accident: उड्डाण पुलावर ट्रकभर बटाटे खाक! लेखानगर परिसरातील घटना; सुदैवाने जीवितहानी नाही

Fire Accident : घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी दाखल होत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले.

सकाळ वृत्तसेवा

सिडको : नाशिक येथून मुंबईच्या दिशेने बटाटे घेऊन जाणाऱ्या ट्रकला सोमवारी (ता.११) लेखा नगर भागात उड्डाणपुलावर आग लागल्याने ट्रकमधील बटाटे खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून ट्रकचालक व क्लीनर सुखरूप आहेत. (Nashik fire truckload of potatoes on flyover Lekha Nagar marathi news)

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी दाखल होत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. उड्डाण पुलावर अचानक ट्रकला आग लागल्यामुळे दोन्हीही बाजूंच्या वाहतुकीची पूर्णतः कोंडी झाली होती. अंबड पोलिस ठाण्याचे पथक, अग्निशमन विभाग यांनी काही वेळात ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

मुंबईच्या दिशेने उड्डाण पुलावरून जाणारा ट्रक क्रमांक (युपी७५ एटी ९३९३) जाताना सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास लेखानगर भागात अचानक ट्रकच्या पाठीमागील टायरला आग लागली आणि काही वेळातच ट्रकची मागील बाजू पूर्णतः जळू लागली. ट्रकला लागलेली आग इतकी भीषण होती की, आजूबाजूला तब्बल पाचशे ते सहाशे मीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (Latest Marathi News)

यामुळे उड्डाण पुलावर काही वेळासाठी वाहतुकीची कोंडी झाली. अंबड पोलिस ठाण्याचे पथक तसेच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अर्ध्या तासात आग विझविण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले. ट्रकमधील बटाटा व इतर साहित्याचे नुकसान झाले. आग बघण्यासाठी लेखानगर तसेच कमोदनगर परिसरातील सर्विस रोडवरही वाहनचालकांनी मोठी गर्दी केली होती. ट्रकला आग कशामुळे लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही.

लँडलाइन नंबर बंदच?

आगीचे कारण शोधण्यासाठी नागरिकांनी सिडको अग्निशमन दल व अंबड पोलिस ठाणे येथील लँडलाइनवर क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दोन्हीही लँडलाइन नंबर लागत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी नेहमीच्या असून संबंधित लँडलाइन फोन का लागत नाही. याबाबतचे उत्तर मात्र अद्यापपर्यंत मिळू शकलेले नाही. अशीच आपाबिती भविष्यात होऊ लागली आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर हे नंबर लागत नसल्यास त्याला जबाबदार कोण, याबाबतचा प्रश्न नागरिक विचारत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

Ujjain Temple: उज्जैनमध्ये आज 'चमत्कार'! पहाटे होणारी भस्म आरती आज दुपारी; वर्षातून फक्त एकदाच मिळते अशी संधी, पाहा काय आहे कारण

टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार, गैर काय? उपमहापौरांनी स्पष्ट केली भूमिका

लाइफ बना दूँगा! रिलस्टार बनवण्याचं आमिष, १५ वर्षीय मुलीवर युट्यूबरचा लेकासह अत्याचार; दोघांना अटक

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT