Naresh Karda esakal
नाशिक

Nashik Naresh Karda Fraud Case : बिल्डर कारडाच्या कार्यालयावर छापा! एमपीआयडीविरोधात कारडाची न्यायालयात धाव

Crime News : बांधकाम व्यावसायिक व कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्याविरोधात पुन्हा देवळाली कॅम्प व नाशिकरोड पोलिसात लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Naresh Karda Fraud Case : बांधकाम व्यावसायिक व कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्याविरोधात पुन्हा देवळाली कॅम्प व नाशिकरोड पोलिसात लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कारडांच्या कार्यालयावर छापा टाकले असून, महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, जामीनावर असलेले कारडाविरोधात पोलिसांनी एमपीआयडी अन्वये कारवाई केल्याने त्याविरोधात कारडा यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. (Nashik Fraud Case Raid on Builder naresh Karda Office news)

देवळाली कॅम्प येथील प्रकाश होलाराम चावला (रा. संसरी, देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित नरेश जगुमल कारडा, दिशा कारडा (दोघे रा. कारडा हाऊस, आनंदनगर, नाशिकरोड) यांच्याविरोधात देवळाली कॅम्प पोलिसांत ८ कोटी ७९ लाख ७२ हजार ३०० रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी विश्वास संपादन करुन त्यांची संमती न घेता सदरची मिळकत एका फायनान्स कंपनीत गहाण ठेवली.

तसेच कर्ज बँकेला परत न करता करारनाम्याचे उल्लंघन केल्याचे फिर्यादी नमूद आहे. त्याचप्रमाणे, उपनगर येथील गणेश विनायक कपोते (रा. खोडदेनगर, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, कारडांसह त्यांच्या भागीदारांविरुद्ध उपनगर पोलिसांत ४८ लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी फिर्यादीसह इतरांकडून फ्लॅट खरेदीची रक्कम स्विकारुन बांधकाम पूर्ण न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणांत स्थानिक पोलिस ठाण्यांसह आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.   (latest marathi news)

कागदपत्रे जप्त

परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत व पथकाने शुक्रवारी (ता. १२) रात्री नरेश कारडा यांच्या कार्यालयावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.

आत्तापर्यंत ७ गुन्हे

बिल्डर नरेश कारडांविरोधात गेल्या नोव्हेंबर २०२३ मध्ये पहिला गुन्हा मुंबई नाका पोलिसात दाखल झाला होता. त्यानंतर, उपनगर पोलिसात तीन, देवळाली कॅम्प पोलिसांत एक, नाशिकरोड पोलिसात दोन असे आत्तापर्यंत सात गुन्हे दाखल झाले आहेत.

जिल्हा न्यायालयात धाव

बिल्डर नरेश कारडा याच्याविरोधात एमपीआयडीअंतर्गत उपनगर पोलिसात नोंद करण्यात आल्याने पोलिसांकडून कारडांना पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. मात्र कारडा यांनी याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी (ता. १५) सुनावणी होणार आहे.

"कारडा यांच्याविरोधात एमपीआयडी दाखल असून त्याविरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी आहे. त्यांच्या कार्यालयातून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत."- मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ronaldo: रोनाल्डोच्या फॉर्मवर लक्ष; पोर्तुगालचा आज सामना

CM Vijay Thalapathy Jan Gan Man: विजय थलपतींचा धाडसी निर्णय, तब्बल २५ वर्षांचा नियम मोडला; तामिळ विधानसभेत पहिल्यांदाच राष्ट्रगीत गायले

Petrol-Diesel-CNG Price: 23 जून रोजी देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरात 1 लिटरचा भाव किती?

Tawade Hotel Area Action : तावडे हॉटेल परिसरात 23 बांधकामे तोडली; महापालिकेची धडक कारवाई, अतिक्रमित झालेली 2900 चौरस मीटर जागा खुली

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जूनपर्यंत येलो अलर्ट; ३० जूनपर्यंत पडणार दमदार पाऊस

SCROLL FOR NEXT