Nashik Lok Sabha Code Of Conduct  esakal
नाशिक

Nashik Code Of Conduct : आचारसहिंता उठल्याने शासकीय कामांना वेग!

Nashik News : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ झालेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारी (ता.५) संपुष्टात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ झालेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारी (ता.५) संपुष्टात आली. आचारसंहितेमुळे गत साडेतीन महिन्यांपासून आचारसंहिता असल्याकारणाने सर्व शासकीय कामांना ब्रेक लागला होता. मात्र, ही आचारसंहिता उठल्याने आता रखडलेल्या जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेतील कामांना वेग येणार आहे. (Nashik Teacher Constituency)

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्च रोजी लागू करण्यात आली होती. ती आचारसंहिता संपत नाही तोच विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे याही निवडणुकीची आचारसंहिता संपणार आहे. आचारसंहितेमुळे अनेक कामे राहून गेली होती. अनेक कामांची निविदा काढण्यात अडचणी येत होत्या.

त्यामुळे आता हे सर्व काम मार्गी लागण्यास मदत होणार आहे. आचारसंहितेमुळे विकासकामांना खीळ बसली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिकेने चालू आर्थिक वर्षाचे अडीच हजार कोटींचे वेळापत्रक मंजूर केले. त्यानंतर १६ मार्चला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती.

त्यामुळे जवळपास अडीच महिने म्हणजे ५ जूनपर्यंत आचारसंहिता लागू होती. त्यामुळे अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या एकाही विभागाच्या कामाला प्रारंभ होऊ शकला नव्हता. लोकसभेची आचारसंहिता संपत नाही तोच राज्य निवडणूक आयोगाकडून शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता पुढे लागू करण्यात आली. (latest marathi news)

त्यामुळे पुन्हा एकदा महिनाभर विकासकामे रेंगाळली. जिल्हा परिषदेची कामे रखडली होती. मात्र, आता या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेमध्ये सेसमधील किमान २० हून अधिक योजनांच्या निविदा आचारसंहितेच्या कालावधीत निघू शकल्या नव्हत्या.

त्याशिवाय जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामाच्या निविदा तसेच जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या इलेक्ट्रीफिकेशन कामाची निविदा तसेच सिव्हील हॉस्पिटलच्या माता बालक रुग्णालयाच्या डीपीची प्रशासकिय मान्यता अशा सर्व कामांचा मार्ग मोकळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT