नाशिकच्या ‘ वायनरी स्ट्रीट’ची उडाली त्रेधातिरपीट Sakal news
नाशिक

नाशिकच्या ‘ वायनरी स्ट्रीट’ची उडाली त्रेधातिरपीट

रस्त्यांमध्ये खड्डे की खड्ड्यांचे रस्ते?

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकला वाइन कॅपिटलचा दर्जा मिळवून देणाऱ्या गोवर्धन ते गंगावऱ्हे या ‘ वायनरी स्ट्रीट’ची त्रेधातिरपीट झाली आहे. रस्त्यांमध्ये खड्डे की खड्ड्यांचे रस्ते, अशी दैना अवस्था झालेली असतानाही दुरुस्तीकडे यंत्रणेच्या जोडीला लोकप्रतिनिधींचा काणाडोळा होत आहे. गोवर्धन ते गंगावऱ्हे रस्ता मध्यंतरी निधीच्या प्रश्नावरून चर्चेत आला होता. त्यामुळे त्याकडे ढुंकून पाहायचे नाही अशी भूमिका घेतली गेली काय, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

या मार्गावर सुला विनियार्ड, सोमा, यॉर्क अशा तीन वायनरी, पाच रिसॉर्ट आणि नाशिकच्या प्रसिद्ध मिसळसह इतर हॉटेल इंडस्ट्री उभी आहे. स्थानिकांचे हाल नेहमीचे झाले आहेत. महिन्याला ३५ हजारांहून अधिक पर्यटक या रस्त्याने ये- जा करतात. त्यामुळे रस्त्यांकडे पाहून नाशिकच्या बाहेरून येणाऱ्यांच्या मनामध्ये नाशिकबद्दल काय प्रतिमा तयार होत असेल, याचा विचार रस्त्यावरील उद्यमांना करवत नाही.

महापालिकेच्या हद्दीतील रस्ता ठीक आहे. मात्र ‘वाय'' आकाराच्या पुढे ८ किलोमीटरपर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे. स्थानिक वायनरीजच्या माध्यमातून मध्यंतरी रस्त्यांची डागडुजी झाली, मात्र ही डागडुजी पहिल्या पावसात वाहून गेली. सध्य:स्थितीत खडी उखडली आहे, यामुळे रस्त्याने वाहन चालवताना कसरत करावी लागते. जेसीबीच्या साहाय्याने स्थानिकांनी रस्त्याच्या कडेला नाले तयार करण्यात आले होते, पण तेही तकलादू ठरले आहेत. रस्त्याच्या एका बाजूने चढ असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करणे महत्त्वाचे बनले आहे. या रस्त्यावरील उद्यमांमधून सरकारला महसूल मिळत असताना नाशिकचे नाव होण्यासाठी मदत होत असताना सुद्धा गांभीर्याने रस्त्याची अवस्था ठीक का केली जात नाही, याचे कोडे काही केल्या उलगडत नाही.

जबाबदारी कोण घेणार?

जिल्ह्यातील विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही, असे गाऱ्हाणे ऐकायला मिळत आहे. अशा परिस्थितीत ‘ वायनरी स्ट्रीट ’ ची अवस्था स्थापत्यशास्त्राच्या अंगाने ठीक करण्यासाठी कोण जबाबदारी घेणार, हा प्रश्‍न अनुत्तरीत राहतो. हा भाग ग्रामीण असल्याने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद लक्ष देणार की नाही, याची स्थानिक व्यावसायिकांना प्रतीक्षा आहे. स्थानिकांकडून होणाऱ्या डागडुजी आणि सहभागाला मर्यादा असल्याने महसुलाचा विचार होणार की नाही, याचे उत्तर अर्थात, आगामी काळात मिळणे स्थानिकांना अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

IND vs NZ 4th ODI: विराट कोहली शून्यावर क्लिनबोल्ड अन् झाली सचिन तेंडुलकरच्या 'नकोशा विक्रम'शी केली बरोबरी

Latest Marathi News Live Update: महाबळेश्वर आणि तापोळा परिसराचा होणार भव्य कायापालट; केबल-स्टेड ब्रिज, बोगदे आणि 'नवीन महाबळेश्वर' प्रकल्पाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा

SCROLL FOR NEXT