Building of sub-centre of Savitribai Phule Pune Vidyapitha being held in Shivanai Shivra. esakal
नाशिक

SPPU University Sub Center: उपकेंद्र इमारत कामांची लगीनघाई..! निवडणूक आचारसंहितेच्‍या शक्‍यतेने कामाची वाढली गती

Latest Nashik News : आगामी विधानसभा निवडणुकांच्‍या आचारसंहितेच्‍या पार्श्वभूमीवर कामाला गती आली असून, सध्या कामांची लगीनघाई सुरू असल्‍याचे ‘सकाळ’च्‍या पाहणीत दिसून आले.

अरुण मलाणी

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहुप्रतीक्षित उपकेंद्र नावारूपाला आले आहे. शिवनई (ता. दिंडोरी) येथे उपकेंद्र इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्‍यात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्‍या आचारसंहितेच्‍या पार्श्वभूमीवर कामाला गती आली असून, सध्या कामांची लगीनघाई सुरू असल्‍याचे ‘सकाळ’च्‍या पाहणीत दिसून आले. रंगरंगोटी, फर्निचरसह इतर कामे पूर्ण करण्याची लगबग सध्या सुरू आहे. (Hasty start of SPPU sub center building)

अगदी उपकेंद्राच्‍या मंजुरीपासून नाशिककरांना प्रदीर्घ संघर्ष करावा लागला. पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र उभारणीला मंजुरी मिळाल्‍यावर जागा मिळविणे, इमारतीच्‍या बांधकामास निधीसह इतर अनेक आव्‍हाने वेळोवेळी उद्‌भवली. वाढीव बांधकामासाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागली.

भरपूर कष्ट घेऊन आता ही इमारत नावारूपाला आली आहे. नवीन शैक्षणिक वर्षालाही नुकतीच सुरुवात झाली. असे असताना उपकेंद्र इमारतीचे उद्‌घाटन आचारसंहितेच्‍या कचाट्यात सापडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात आल्‍यावर इमारतीचे काम पूर्ण करण्यास गती देण्यात आली.

इमारत कामाची स्‍थिती जाणून घेण्यासाठी ‘सकाळ’ने पाहणी केली असता, कामांची लगीनघाई दिसून आली. इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून, रंगरंगोटी सुरू होती. प्‍लंबिंगचे काम बाकी होते. तसेच, फर्निचरचेही भरपूर काम बाकी असल्‍याचे दिसून आले. ठेकेदारांकडून पूर्ण क्षमतेने कारागीर लावत कामाला अंतिम रूप देण्यासाठी प्रयत्‍न सुरू असल्‍याचेही आढळून आले. (latest marathi news)

महायुतीच्‍या कार्यकाळात उद्‌घाटन

राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार असताना १७ जून २०२२ ला नाशिक उपकेंद्र इमारतीच्‍या बांधकामाचे भूमिपूजन झाले होते. तत्‍कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दृकश्राव्य माध्यमातून कार्यक्रमात सहभाग नोंदविला. तत्‍कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, तत्‍कालीन पालकमंत्री छगन भुजबळ कार्यक्रमास उपस्‍थित होते.

या कार्यक्रमानंतर अवघ्या काही दिवसांनंतर राजकीय भूकंप होऊन महायुतीचे सरकार राज्‍यात उदयाला आले. सध्या महायुतीचे सरकार असून, आगामी निवडणुकांच्‍या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे सध्याच्‍या महायुती सरकारच्‍या कार्यकाळात उद्‌घाटन होते का, याकडे शैक्षणिक क्षेत्रासह सर्वसामान्‍यांचे लक्ष लागून राहील.

उपकेंद्र इमारतीबाबत जाणून घ्या...

- ३१ हजार स्‍क्‍वेअर फूटचे बांधकाम

- १५६ आसनक्षमता असलेले सभागृह

- एकूण १२ वर्गखोल्यांची सुविधा

- प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्‍टोअर रूमचा समावेश

- परीक्षा विभाग, प्रशासकीय विभागाचे कार्यालय

- बैठक खोलीची उभारणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT