Health department  esakal
नाशिक

Nashik News : मुख्यालयी थांबा अन्यथा प्रशासकीय कारवाईचा बडगा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोरेंची तंबी

Nashik News : सटाणा तालुक्यातील वीरगाव, नाशिक तालुक्यातील शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकारामुळे खडबडून झालेले जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग आता अॅक्शन मोडवर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सटाणा तालुक्यातील वीरगाव, नाशिक तालुक्यातील शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकारामुळे खडबडून झालेले जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग आता अॅक्शन मोडवर आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी यांनी मुख्यालयी थांबावे, रात्रीला एक अधिकारी असणे बंधनकारक आहे. (Health department of Zilla Parishad is now on action mode)

मुख्यालयी अधिकारी गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी तंबी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली. तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी सरप्राईज व्हीजीट करतील, वैद्यकीय अधिकार्यांनीही तालुक्यातील आरोग्य केंद्रांना अचनाक भेटी द्याव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात गुरूवारी (ता.४) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोरे यांच्या उपस्थितीत सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची बैठक झाली. बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दीपक लोणे आदी उपस्थित होते.

बैठकीत आरोग्य विभागातंर्गत असलेल्या मेलरिया, डायरिया, डेंग्यू, माताबालसंगोपन कार्यक्रम, असंसर्गिक आजार नियंत्रण कार्यक्रम, ई-संजीवणी, ई-सुश्रुत, आयुषमान भारत, मात प्रसृती, आरोग्य केंद्राची ऑनलाइन कामे आदींचा यावेळी सविस्तर आढावा झाला. यात काही प्राथमिक आरोग्य केंद्रात कमी काम दिसून आले. त्यावर डॉ. मोरे यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांची झाडाझडती घेत, फैलावर घेतले. (latest marathi news)

या कामात सुधारण करावी, अशा सूचना डॉ. मोरे यांनी दिल्या. दर महिन्याला चांगल्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा बैठकीत सत्कार करण्यात येतो. यात या महिन्यात मोहाडी, खामखेडा व वाडीव-हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकार्यांच्या चांगल्या कामकाजासाठी सन्मान करण्यात आला.

सर्वात निराशाजनक काम असलेल्या सोमठाणे, नांदगाव सदो, मुळवड प्राथमिक आरोग्य केंद्रांना कामकाजात सुधारणा करण्याची तंबी देण्यात आली. मुख्यालयी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका राहत नसल्याचे प्रकार पुन्हा वाढल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. वारंवार या तक्रारी येत असल्याने त्यांनी खुली नाराजी व्यक्त केली.

वैद्यकीय अधिकार्यांनी मुख्यालयी थांबणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक अधिकारी थांबत नसल्याचे दिसत आहे. यापुढे असे प्रकार होता कामा नये अन्यथा, गैरहजर सापडणार्या अधिकार्यांवर कारवाई केली जाईल, त्यांची गई केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT