Hoardings in city esakal
नाशिक

Nashik NMC News : निवडणुकीच्या तोंडावर शहरात ‘होर्डिंग्ज वॉर’! महापालिकेचे दुर्लक्ष; ‘आय साइट’ नसल्याने अपघाताची शक्यता

Latest Nashik News : शहरात राजकीय नेत्यांचे होर्डिंग्ज वॉर नित्याचे झाले असले तरी यंदा मात्र या होर्डिंग वॉरला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC News : विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत असताना गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह येणाऱ्या दीपावली सणाचे औचित्य साधून मतदारांसमोर जाताना इच्छुकांकडून शहरात वाहतूक बेटांसह जागोजागी लावण्यात आलेल्या होर्डिंग्जमुळे निवडणूक घोषणेपूर्वीच युद्ध सुरु झाले आहे.

एकावर एक लावल्या गेलेल्या होर्डिंग्जमुळे इच्छुकांमधील स्पर्धा तीव्र झाल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु एकीकडे होर्डिंग्ज वॉर सुरू असताना दुसरीकडे मात्र वाहनधारकांना ‘आय साइट मिळत नसल्याने अपघातदेखील वाढले आहेत. (Hoardings war in city ahead of elections NMC neglect)

शहरात राजकीय नेत्यांचे होर्डिंग्ज वॉर नित्याचे झाले असले तरी यंदा मात्र या होर्डिंग वॉरला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले आहे.

विशेष करून बाजारपेठेचे भाग व नवरात्रोत्सव मंडळ तसेच देवी मंदिरांच्या ठिकाणी होर्डिंग लावल्याने शहरात विद्रूपीकरण तर वाढलेच मात्र किरकोळ अपघातदेखील वाढले आहेत. विशेष करून वाहतूक बेटांवर आय साइट अर्थात वाहनधारकांना चारही बाजू पारदर्शकपणे दिसण्यासाठी कुठल्याही प्रकारचे होर्डिंग लावू नये अशा वाहतूक शाखेच्या स्पष्ट सूचना आहेत.

मात्र असे असतानादेखील राजकीय पक्षाकडून होर्डिंग लावून ताकद दाखविली जात आहे. परंतु यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांची मोठी तारांबळ उडत आहे. त्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. होर्डिंगधारकांवर कारवाई करण्याची आवश्यकता असताना महापालिकेने राजकीय दबावामुळे हात वर केल्याचे दिसून येत आहे. वास्तविक अतिक्रमण विभागाकडून सर्व होर्डिंग जप्त करून कारवाई करणे आवश्यक आहे. महापालिकेकडून कारवाई होत असली तरी ती कारवाई नावापुरती असल्याची दिसून येते. (latest marathi news)

एक दिवसातील विभागनिहाय कारवाई

विभाग जप्त केलेले होर्डिंग्ज

पूर्व ३२

पश्‍चिम ६

नाशिक रोड ३२

सिडको ४५

पंचवटी १

सातपूर ७

------------------------

एकूण १२३

"शहरात होर्डिंग मोठ्या प्रमाणात असले तरी विनापरवानगी लावलेले होर्डिंग्ज शोधून जप्तीची कारवाई केली जात आहे."- मयूर पाटील, उपायुक्त, अतिक्रमण विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Bans Social Media : नेपाळमध्ये मोठा डिजिटल स्ट्राईक ! युट्यूब,फेसबूकसह २३ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी, सरकारने सांगितले 'हे' कारण

Kolhapur Friend Killed : ६० वर्षांची मैत्री एका शिवीमुळे संपली, जिवलग मित्रानेच धारधार शस्‍त्राने केला खून; दोघेही ७३ वयाचे, असा आहे घटनाक्रम...

Latest Maharashtra News Updates : नंदुरबारमध्ये पुढील २४ तासांत अति मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

Latur Crime: पतीनेच पत्नीचा खुन करुन मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला; साथीदारांच्या मदतीने उशी दाबून घेतला जीव

Who Is IPS Anjali Krishna : अजित पवारांना नडणाऱ्या आयपीएस अंजली कृष्णा कोण? मुरुम उत्खननाविरोधातील कारवाईमुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT