Dead driver kasbe esakal
नाशिक

Nashik Accident News : तस्करांच्या गाडीचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्काच्या वाहनाचा भीषण अपघात

Nashik Accident : चांदवड मनमाड रोडवर हरणूल जवळ अपघात होऊन चालक जागीच ठार झाला, तर दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

भाऊसाहेब गोसावी

चांदवड : मद्य तस्करांच्या गाडीचा पाठलाग करताना सीमाशुल्क विभागाचे वाहन क्रमांक एम एच 15=एच एम 8859 या वाहनाचा चांदवड मनमाड रोडवर हरणूल जवळ अपघात होऊन चालक जागीच ठार झाला, तर दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. मद्य तस्करांची मुजोरी इतकी वाढली की आज थेट पोलिसांनाच आपला जीव गमवावा लागला. अवैधरित्या दारूची वाहनातून तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (Horrific accident of state excise vehicle while chasing traffickers car )

त्यानुसार सीमा शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचत दारू वाहतूक करणारे वाहन दिसल्यानंतर पथकाने गाडी पकडण्यासाठी पाठलाग सुरु केला. मात्र पाठलाग करताना सीमा शुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात होऊन सीमा शुल्क विभागाच्या वाहनवरील चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर लासलगाव पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. चांदवड- लासलगाव रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दारूची अवैधरित्या वाहतूक केली जात असलेल्या वाहनाची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती.

दारू जप्त करण्याच्या अनुषंगाने सीमा शुल्क विभागाच्या पथकाने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पथकाने चांदवड- लासलगाव रस्त्यावर सापळा रचला होता. सीमा शुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्यासाठी सीमा शुल्क विभागाच्या वाहनातुन पाठलाग सुरु केला. यावेळी या वाहन चांदवडहून मनमाड रोड कडे पळाले. या वाहनाला समांतर पाठलाग करत असतानाच या वाहनाने सीमा शुल्क विभागाच्या वाहनाला कट मारल्यानंतर सीमा शुल्क विभागाचे वाहन हरणुल गावाजवळ थेट शेतात जाऊन पलटी झाले.

यावेळी या वाहनाने तीन चार पलट्या घेतल्याने यात सीमा शुल्क विभागाचे चालक कसबे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. यावेळी घटनास्थळी तात्काळ चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ व टिम दाखल झाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT