अनधिकृत बांधकाम sakal
नाशिक

नाशिक : अनाधिकृत बांधकाम नियमीतकरणावर दहा वर्षांनंतर फुली

वाढीव दराने घरपट्टी; बांधकाम पूर्णत्वाचा दाखला बंधनकारक, जादा विषयात मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात सहाशे चौरस फुटाच्या आतील अनधिकृत बांधकामे नियमित करताना घरपट्टीच्या दंडात माफी देण्याबरोबरच सहाशे चौरस फुटापुढील अनधिकृत मिळकतींना मालमत्ता कराच्या पन्नास टक्के तर एक हजार चौरस फुटापुढील अनधिकृत मिळकतींना त्या वर्षाच्या मालमत्ता कराच्या दुप्पट्टीने दंड आकारला जाणार आहे. विशेष म्हणजे दहा वर्षानंतर बांधकाम नियमित न केल्यास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला जोपर्यंत घेतला जात नाही, तोपर्यंत दंडात्मक आकारणी कायम राहणार आहे. महासभेत मागच्या दाराने म्हणजे जादा विषयात मंजुरी दिली आहे.

शहरात अनियमित बांधकामे नियमित करण्याच्या वांरवार घोषणा होत असल्याने अनियमित बांधकाम करणाऱ्यांचे फावते आहे. अनियमित बांधकाम केले तरी कालांतराने त्यावर तोडगा निघतोच, अशी धारणा अनेकांची झाल्याने शहरांच्या बकालपणात वाढ होत आहे. राज्य शासनाने सन २०१७ मध्ये अनधिकृत बांधकामांवर दरवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट दराने दंड आकारणी करण्याचा नियम केला आहे. त्याचबरोबर दंडात्मक कारवाई करताना दहा वर्षांपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्राप्त करण्याची तरतूद केली आहे.

दहा वर्षांच्या कालावधीमध्ये पूर्णत्वाचा दाखला प्राप्त न केल्यास त्यानंतरही वाढीव दंड भरून नियमितीकरण होत होते. आता या नियमात सुधारणा करण्यात आली असून, जोपर्यंत भोगवटा प्रमाणपत्र घेतले जात नाही तोपर्यंत दंडात्मक आकारणी कायम राहणार आहे. सहाशे चौरस फुटांच्या निवासी बांधकामांना दंड आकारला जाणार नाही. परंतु ६०१ ते १००० चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत निवासी बांधकामासाठी दरवर्षीच्या मालमत्ता कराच्या पन्नास टक्के दराने दंड तर त्यापुढील आकाराच्या निवासी बांधकामासाठी दुप्पट दंडात्मक दराने दंड आकारणीची तरतूद करण्यात आली आहे.

प्रस्तावाला जादा विषयात मंजुरी

राज्य शासनाने निवासी बांधकामे नियमितीकरणासंदर्भात नव्याने जाहीर केलेल्या नियमाबाबत महासभेत चर्चा होणे गरजेचे होते. परंतु, चर्चा न करताच जादा विषयात प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने सत्ताधारी भाजपच्या भूमिकेबद्दल पुन्हा एकदा संशय निर्माण होत आहे. यापूर्वी बीओटी, घंटागाडीचे प्रस्ताव जादा विषयात मंजूर करण्यात आले होते. महासभेत भाजपचे बहुमत आहे. एखादा विषय मंजूर करायचा ठरल्यास बहुमताच्या जोरावर सहज शक्य आहे, मात्र वांरवार जादा विषयात प्रस्ताव मंजूर केले जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT